निवासी डॉक्‍टर उपसणार संपाचे हत्यार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नागपूर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने देशातील वैद्यकीय क्षेत्रात असंतोष भडकला आहे. देशभरात डॉक्‍टरांकडून निषेध होत असून याचे पडसाद उपराजधानीतही उमटले. सात ऑगस्टपासून येथील मेडिकल, मेयोतील निवासी डॉक्‍टर संपाचे हत्यार उपसणार आहेत. राज्यातील निवासी डॉक्‍टरांच्या केंद्रीय संघटनेच्या सूचनेनुसार स्थानिक मार्डतर्फे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना संप पुकारण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. त्यामुळे मेडिकल, मेयोसह सुपर स्पेशालिटीची रुग्णसेवा प्रभावित होणार हे मात्र निश्‍चित.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकामुळे ऍलोपॅथी डॉक्‍टर आणि केंद्र सरकारमध्ये विरोधाचा सामना चांगलाच रंगला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक व इतर राज्यांमध्ये निवासी डॉक्‍टरांनी संप पुकारला. आंदोलन केले. मात्र, याचा परिणाम केंद्रशासनावर झाला नाही. यामुळे आता देशभरातील निवासी डॉक्‍टरांनी या विधेयकाच्या विरोधात बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांच्या मार्डकडून एल्गार पुकारण्यात आला असून मेडिकल आणि मेयोच्या निवासी डॉक्‍टरांनी सोमवारी अधिष्ठातांना संपाची नोटीस दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resident doctors will protest