मातृशक्तीचा आदर करा!

File photo
File photo

मातृशक्तीचा आदर करा!
नागपूर : मातृशक्तीचा अनादर केल्यास समाजाचा ऱ्हास होत असल्याचे सांगून स्त्रीचा आदर करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंडित दीनदयाल संस्कृती संवर्धन समितीतर्फे आयोजित मातृत्व वंदन कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कांचन गडकरी, महापौर नंदा जिचकार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मुन्ना यादव उपस्थित होते. समाजात नारीशक्‍तीला मोठे स्थान आहे. समाज आणि देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. ज्या देशांमध्ये नारीशक्तीचा सन्मान झाला नाही, त्या देशाचा विकास झाला नाही. उलट नुकसानच झाले आहे. कुटुंबाच्या भरभराटीतही स्त्रीचे मोठे योगदान आहे. कुटुंबातील एक स्त्री शिकली की, कुटुंबाला शिक्षित करते. पुरुष शिक्षित झाला की, तो एकटाच शिक्षित होतो. त्यामुळे स्त्रीचे शिक्षण आवश्‍यक आहे. भ्रूणहत्या हे सर्वांत मोठे पाप आहे. भ्रूणहत्येमुळे समाजात असमतोल निर्माण झाला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तीन हजार महिलांना साडी वाटप करण्यात आली. तसेच नऊ महिलांची ओटी भरून सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com