एटीएमकार्ड बदलून निवृत्त शिक्षकाला लुबाडले

File photo
File photo

अमरावती : शहरातील रेल्वेस्थानक चौकातील एसबीआय च्या एटीएम सेंटरवर एका ग्राहकाच्या एटीएमकार्डची तोतयाने अदलाबदली करून सेवानिवृत्त शिक्षकाची 42 हजार रुपयांनी शुक्रवारी (ता. 16) फसवणूक केली.
नसिमउद्दीन मोहंमद साहेब (वय 60) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते स्वत: सेवानिवृत्त शिक्षक आहेत. नसीमउद्दीन हे या एटीएम सेंटरवर पैसे काढण्यात गेले असता, त्यांचे कार्ड मशीनमध्ये ओढल्या जात नव्हते. त्याचवेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीजवळ स्वत:चे एटीएमकार्ड देऊन त्याला, प्रयत्न करण्यास सांगितले. तोतयाने ओरिजनल कार्ड स्वत:कडे ठेऊन पैसे काढण्याचे नाटक केले व बनावट एटीएमकार्ड नसीमउद्दीन यांना परत केले. थोड्याच वेळात त्यांच्या बॅंक खात्यामधून 20 हजार रुपये विड्राल केल्याचा व त्यानंतर ऑनलाइन 22 हजार रुपये सुनील यादव नामक व्यक्तीच्या खात्यात वळते केल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. पैसे काढत असताना, तोतयाने एटीएमकार्डचा पासवर्ड लक्षात ठेवल्याचे या घटनेवरून दिसून येते. नसीमउद्दीन यांनी एसबीआयमध्ये चौकशी केली असता, खात्यातून पैसे लुबाडल्या गेल्याचे सांगितले. शहर कोतवाली पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com