सतीश होले विद्यापीठातून सेवानिवृत्त

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व पतसंस्थेचे माजी संचालक असलेले नगरसेवक सतीश होले गुरुवारी (ता. 31) विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले. ते विद्यापीठाच्या आरोग्य विभागात "फार्मासिस्ट' या पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने दीक्षान्त सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते.
विशेष अतिथी म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी उपस्थित होते. यावेळी डॉ. विनायक देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मनोगतामध्ये सतीश होले यांनी 34 वर्षांच्या सेवेत निर्माण झालेल्या अनेक प्रसंगांच्या आठवणीला उजाळा दिला.
विद्यापीठात होले यांनी 30 वर्षे कर्मचारी पतसंस्थेत एकहाती सत्ता मिळवीत, तीनवेळा अध्यक्ष व संचालक म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी सिनेट सदस्य म्हणूनही काम केले आहे. कार्यक्रमात सतीश होले यांना शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भेट देत, विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठातर्फेही शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देत, सत्कार केला.
यावेळी कार्यक्रमात उपकुलसचिव प्रदीप बिनिवाले, वसीम अहमद, डॉ. रमण मदने, मोतीराम तडस, डॉ. राजेंद्र उतखेडे, प्रदीप मसराम, प्रकाश मांडोकर, युवराज बांते, मारोती बोरकर, सुचित्रा शेंडे, अश्‍विनी काळे, अर्चना राठोड, यादव आंबिलडुके, धनुसिंग पवार, दिनेश दखने, सुधाकर पाटील, जगदीश रमधन, अभय कोट्टेवार व सर्व विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी आभार मानले.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com