नागपूर : बेलतरोडी येथील टीसीएसच्या "आयोन डिजिटल' या केंद्रावर स्टाफ सिलेक्शनची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार कार्डवर जन्मतारखेची नोंद नसल्याच्या कारणाने शुक्रवारी (ता. 2) परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परीक्षार्थ्यांना परीक्षा न देता परत जावे लागले. यावेळी परीक्षार्थ्यांनी रोष व्यक्त केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शासकीय विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो युवक अर्ज करतात. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवरून स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा तीन शिफ्टमध्ये शहरातील विविध परीक्षा केद्रांवरून घेतली जात आहे. ऑनलाइन प्राप्त झालेले प्रवेशपत्र व सोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्डसोबत आणण्याच्या सूचना परीक्षार्थ्यांना केल्या होत्या. परंतु, अनेक परीक्षार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नव्हते. त्यावर जन्मतारखेचा उल्लेख नसल्या कारणातून अनेक परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. या परीक्षेकरिता नागपूरसह गोंदिया, भंडारा व राज्यातून परीक्षार्थी पोहोचले होते. त्यातील 60 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे समजते. यावेळी परीक्षार्थ्यांनी नाराजी व्यक्त करीत विरोध केला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, काहीच होत नसल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थी परतले.