महापौरांनी घेतली आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी अग्निशमन बंबांची व्यवस्था, रस्त्यातील दुरुस्ती, अतिक्रमण, झाडांची ट्रिमिंग, पाणीपुरवठा याबाबत आढावा घेतला. अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित केली. उद्या गुरुवार रोजी सकाळी 10.30 वाजता दीक्षाभूमी व त्यानंतर मानकापूर येथे पाहणी दौरा करणार आहेत. बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष उपनेते विक्की कुकरेजा, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्ता पक्षनेते दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. मानकापूर येथे मोबाईल टॉयलेट, चालते-फिरते दवाखानेदेखील सज्ज ठेवण्याची सूचना महापौर यांनी केली.
Web Title: review meeting by mayor