गुन्हेशाखेच्या कारवाईत तांदूळ जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

अमरावती : स्थानिक गुन्हेशाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून अवैधरीत्या तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून ट्रकसह 40 लाखांचा माल जप्त केला.

अमरावती : स्थानिक गुन्हेशाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून अवैधरीत्या तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून ट्रकसह 40 लाखांचा माल जप्त केला.
सोमवारी (ता. सात) 5 सुमारास ग्रामीण गुन्हशाखेचे पोलिस गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून तळेगाव दशासर हद्दीतील श्रीहरी धाबा कारंजा-नागपूर हायवेवरून अवैधरीत्या तांदळाची वाहतूक करणाऱ्या एमएच 16 सीसी 7644 क्रमांकाच्या ट्रकला पकडले. सदर ट्रकमध्ये 25.1 टन सरकारी तांदूळ आढळून आला. या तांदळाची किंमत 5 लाख 17 हजार रुपये एवढी आहे. पोलिसांनी तांदळासह ट्रक असा 40 लाख रुपयांचा माल जप्त केला. ट्रकचालक बाळू घरीनाथ सोनवणे (28, रा. मनोर जिल्हा बीड) यास तळेगाव दशासर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice confiscated in criminal activity