हे आहे  योग्य आहार, ध्यान, व्यायाम वजन कमी करण्याची त्रिसूत्री ः वाचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

त्यामुळेही वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे. शिजवलेले अन्न रात्री एकवेळ घ्यावे, कारण ते पचण्यास 16 तासांचा वेळ लागतो. दिनचर्येबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की सकाळी चारला रोज उठून सौम्य व्यायाम करणे, ध्यान करणे गरजेचे आहे.

यवतमाळ : वजन कमी करण्याचे अनेक फॉर्मूले सर्वत्र उपलब्ध आहेत. मात्र, योग्य आहार, ध्यानसाधना व नियमित व्यायाम करणे, ही वजन कमी करण्यासाठी व सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री आहे, असे मत गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थाकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी व्यक्त केले. त्यांनी स्वत:वर केलेल्या प्रयोगाचे दाखले देत वजन कमी करणे व सुदृढ आरोग्यावर मार्गदर्शन केले.
येथील आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाच्या वतीने रविवारी (ता. 2) मैत्रिदिनी 'रेसिपी ऑफ वेट लॉस ऍण्ड फिटनेस'या विषयावर वेबिनार घेण्यात आले. विशेष म्हणजे या विषयावर प्राचार्य डॉ. उदय नावलेकर व धनंजय तांबेकर यांनी स्वानुभवातून मिळविलेल्या ज्ञानातून वजन कमी कसे करावे व निरोगी जीवन कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी धनंजय तांबेकर म्हणाले की, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी मन प्रसन्न असावे लागते. नेहमी वर्तमानात जगणे शिकले पाहिजे. ताण असला की मन दु:खी होते.

हे वाचा— वीज दरवाढीनंतर कशामुळे तापणार नागपुरातील वातावरण?

 

त्यामुळेही वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे. शिजवलेले अन्न रात्री एकवेळ घ्यावे, कारण ते पचण्यास 16 तासांचा वेळ लागतो. दिनचर्येबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की सकाळी चारला रोज उठून सौम्य व्यायाम करणे, ध्यान करणे गरजेचे आहे. त्यानंतर पालक, मेथी, कोथिंबीर, आवळा व शेंदेमीठ यांचा रस घेणे व त्यानंतर दुपारी भूक लागेल तेव्हा फलाहार करणे आवश्‍यक आहे. शिजवलेले अन्न व दूध टाळले तर वजन कमी होण्यास मदत होईल. तसेच नियमित व्यायाम, पोहणे, सायकलिंग करणे गरजेचे आहे. अन्नातून साखर, मीठ व दुधाच्या वस्तू वर्ज्य कराव्यात. आहारात शाकाहाराला महत्त्व द्यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. निरोगी, सुदृढ, दिर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी मन व शरीर स्वस्थ असले पाहिजे. मनाचा शरीरावर परिणाम होत असतो. मनात येणारे अनावश्‍यक विचार टाळण्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी वजन कमी कसे करता येईल याबाबत काही टिप्स दिल्या. पारवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नावलेकर व गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी वजन कमी करणे व तंदुरुस्त राहणे याबाबत 'न्यू डायट सिस्टिम'विषयी मार्गदर्शन केले. डी. व्ही. चव्हाण यांनी या 'न्यू डायट सिस्टिम'ची सुरवात केली आहे. याचा हजारो लोकांना फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. गजानन राहाटे यांनी प्रास्ताविक केले. आदित्य नवघरे यांनी तांत्रिक सहाय्य केले.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the right diet, meditation, exercise weight loss triad: read