कुख्यात मारुती नव्वाचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

नागपूर - एकेकाळी कुख्यात गुंड राजू बद्रेचा राइट हॅंड समजल्या जाणाऱ्या मारुती नव्वाचे खंडणीसाठी कारमधून अपहरण करण्यात आले. त्याला चांगले बदडल्यानंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी पाच ते सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

नागपूर - एकेकाळी कुख्यात गुंड राजू बद्रेचा राइट हॅंड समजल्या जाणाऱ्या मारुती नव्वाचे खंडणीसाठी कारमधून अपहरण करण्यात आले. त्याला चांगले बदडल्यानंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी पाच ते सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

मारुती ऊर्फ नव्वा संतोष वलके (वय ४२, रा. मिरे ले-आउट, नंदनवन) हा गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणा येथील एका शेतावर दारूच्या पार्टीत गेला होता. या पार्टीचे आयोजन कुख्यात साजीद खानने केले होते. या पार्टीत विजू मोहड, सुजित रामदास राऊत आणि अन्य दोन साथीदारांनी मारुती नव्वाला दोन लाख रुपयांची मागणी केली. ‘आम्ही जुगारात दोन लाख रुपये हरलो आहे. त्यामुळे तू दोन लाख रुपयांचा जुगाड कर, अन्यथा तुला गेम करू’ अशी धमकी दिली. मारुती नव्वाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींना त्याला शेतातच बदडले आणि सोडून दिले. ‘तुला पुन्हा पाहून घेऊ’ अशी धमकी दिली. तेव्हापासून नव्वा लपून बसला होता. आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता बापूनगरात नव्वा मित्र अशोक यादवसोबत कारमध्ये लपून बसला होता. दरम्यान, वरील आरोपी तेथे आले. त्यामुळे जीव वाचविण्याच्या भीतीने नव्वा पळायला लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून कारमध्ये कोंबले. म्हाळगीनगर चौकात नेले. तेथे त्यांची चांगली धुलाई केली आणि सोडून दिले. रोजरोजच्या मारहाणीला कंटाळून मारुती नव्वाने नंदनवनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

यापूर्वी, तडीपार गुंड पंकज मोरयानी याने नव्वाला फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हासुद्धा नव्वा शहर सोडून पळाला होता, हे विशेष.

Web Title: Right Hand Maruti of Notorious Raju Badre

टॅग्स