अवकाळी पावसामुळे संसर्गाचा धोका 

file photo
file photo

नागपूर : ऑक्‍टोबर हीट सुरू असताना अखेरच्या सप्ताहात अचानक अवकाळी पाऊस बरसला. यामुळे हवेत गारवा आला आहे. वातावरण सतत थंड, गरम होत आहे. हवामानात झालेला हा बदल लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बरा नाही. त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः श्‍वसनमार्गासह संसर्ग आजार व दमाग्रस्तांना त्रास जाणवत आहे. 
मागील तीन आठवड्यांपासून उपराजधानीत ऑक्‍टोबर हीट जाणवत आहे. उकाड्यामुळे नागपूरकर बेजार झाले असल्याचे चित्र होते. मात्र, शनिवारी मध्यरात्री पडलेल्या पावसाने नागपुरातील वातावरण बदलले. वातावरणात गारवा आला. हा गारवा संसर्ग आजार असलेल्या स्वाइन फ्लूपासून तर डेंगीसाठी पोषक आहे. वैद्यकीयतज्ज्ञांकडून सांगण्यात आल्याप्रमाणे वातावरणात अवकाळी पावसामुळे होणारे बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारे असतात. यामुळे ज्येष्ठांना लसीकरणाचाही पर्याय पुढे ठेवावा. वातावरणात होणाऱ्या बदलांना लक्षात घेत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाचे सहयोगी प्राध्यापक तसेच फिजिशियन डॉ. प्रवीण शिंगाडे यांनी सांगितले. 
अचानक बरसलेला पाऊस लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. ताप, खोकला, सर्दीची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या मेडिकलमध्ये वाढली आहे. श्‍वसनाचे आजार वाढतात. तसेच "गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. डेंगीच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशा रुग्णांची संख्या मेडिकलमध्येही वाढली आहे. तर दमाग्रस्तांसाठी हवेतील गारवा तसेच येणारा हिवाळादेखील जोखमीचा आहे. 
अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांना खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, तर औषधं सोबत ठेवावी. अचानक आलेल्या पावसामुळे श्‍वसनासंबंधीच्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते. अस्थमा, ब्रॉन्कायटीस आजारदेखील वाढतात. 
-डॉ. प्रवीण शिंगाडे, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com