स्क्रब टायफसचा धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नागपूर : मागील वर्षी स्क्रब टायफसच्या आजाराने 32 रुग्णांचे बळी घेतले होते, तर 201 रुग्ण आढळून आले होते. यावर्षी पावसाळ्यातील ऑगस्ट महिन्यात 5 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील दोन रुग्णांसह भोपाळ, इटारशी आणि भंडारा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

ट्रॉम्बिक्‍युलीड माइट्‌सचे लारव्हे; ज्याला चिगर माइट्‌स म्हणतात त्याच्यातील ओरिएन्शिया सुसुगामुशी जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने स्क्रब टायफसचा धोका आहे. स्क्रब टायफसवर उपचार न घेतल्यास साधारण 50 टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो. योग्य उपचार मिळाले नाही, तर 25 टक्के रुग्णांचा मृत्यूही होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नागपुरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. एकट्या नागपुरात 100 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, विभागात 19 जण स्क्रबने दगावले आहेत. यामुळे या आजाराचे मूळ शोधून काढण्यासाठी नागपुरात दिल्ली येथील राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राचे (एनआयसीडी) पथक आले होते. त्यांच्या मदतीला आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ होते. रुग्ण आढळून येणाऱ्या भागातील उंदीर पकडण्यासाठी आरोग्यकर्मचाऱ्यांना "रॅट ट्रॅप' लावण्यात आले होते. पकडलेल्या उंदरांच्या अंगावरील चिगर माइट्‌स काढून अभ्यासही केला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk of scrub typhus