Vidhan Sabha 2019 रिसोडात चुरस; कारंजात अटीतटीचा सामना

राम चौधरी
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

वाशीम : विधानसभा निवडणुकीला आता चार दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. या परिस्थितीत कारंजात दुरंगी अटीतटीचा सामना तर रिसोडात तिरंगी चुरस निर्माण झाली आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना होत असला तरी, कॉंग्रेसने लढाईआधीच मैदान सोडले आहे.

वाशीम : विधानसभा निवडणुकीला आता चार दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. या परिस्थितीत कारंजात दुरंगी अटीतटीचा सामना तर रिसोडात तिरंगी चुरस निर्माण झाली आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना होत असला तरी, कॉंग्रेसने लढाईआधीच मैदान सोडले आहे.
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे लखन मलिक, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिद्धार्थ देवळे व अपक्ष शशिकांत पेंढारकर यांच्यात सामना रंगत आहे. भाजपचा परंपरागत प्रतिस्पर्धी असलेली कॉंग्रेस मात्र लढतीत दिसत नसल्याचे चित्र आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात अपक्ष अनंतराव देशमुख, कॉंग्रेसचे अमित झनक तर वंचित बहुजन आघाडीचे दिलीप जाधव यांच्यात चुरस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत कॉंग्रेसने बरेच डॅमेज कंट्रोल केल्याने, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष यांच्यासोबत होणारा कॉंग्रेसचा सामना आता अपक्षासोबत होत असल्याचे चित्र आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात चौरंगी सामना होईल अशी अटकळ होती. मात्र, या मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पाटणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश डहाके यांच्यात अटीतटी सामना होत आहे. बसपचे युसूफ पुंजानींही रिंगणात लक्षवेधी ठरत असल्याने येथे तिरंगी की, दुरंगी? याबाबत उत्सुकता आहे.

मतविभाजनावर अनेकांची मदार
तीन मतदारसंघातील मतांचे धृवीकरण व मतांचे विभाजन यावर राजकीय गणिते बांधली जात आहेत. कारंजा मतदारसंघातील बहुसंख असलेला बंजारा समाज, रिसोड विधानसभा मतदारसंघातील मराठा व वाशीम विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाची भूमिका या तीनही मतदारसंघातील विजयाचा लोलक कुणीकडे जाणार, याचा फैसला करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: risod and karanja vidhan sabha constituency