विदर्भातील 'या' पालिकेत भाजपच्या हाती भोपळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला निवडून आणता न आल्याने भाजपचे जिल्ह्यात काउनडावू सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

वाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला निवडून आणता न आल्याने भाजपचे जिल्ह्यात काउनडावू सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

रिसोड नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणूकीत भाजप शिवसेना व शिवसंग्रामने युती करून उडी घेतली होती. नगराध्यक्ष पदही थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या युतीने नगराध्यक्ष पदासाठी ज्योती मगर यांना उमेदवारी दिली होती. मात्र निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांनी भाजपचा निकाल लावल्याचे चित्र समोर आले.

शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला. मात्र भाजपला खातेही उघडता आले नाही. रिसोड नगरपालिका निवडणूक काॅग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी एकतर्फी जिंकली नगराध्यक्ष व नऊ नगरसेवक निवडून आणून देशमुखांनी पुन्हा आपला करिष्मा कायम ठेवला.

Web Title: in Risod Corporation Election Bjp Dosent win single seat