चिमुकल्या रिशूचे दोन्ही हात झाले सरळ!

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः रिशू ठाकूर. वय वर्षे 12. मूळची बालाघाट, जन्मत:च दोन्ही हातांचे पंजे वाकडे. प्रसाद घेण्यासाठी हात सरळ करता येत नव्हता... दोन्ही हातांच्या पंजाची दिशा खाली जमिनीकडे... वैद्यकीय भाषेत याला "कन्जेनायट रेडिओ उलणार सायनोस्टोसिस' असे म्हणतात. या वाकड्या हाताने या चिमुकलीला दैनंदिन स्वत:ची कामे करणेही अवघड. त्यात ही मुलगी.. पाहणाऱ्या नजरांमुळे तिला रडू कोसळायचे. आई-वडिलांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले, अशातच गावात लागलेल्या आरोग्य शिबिरात डॉ. विराज शिंगाडे यांनी रिशूला बघितले आणि नागपुरातील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली. आता रिशूचे दोन्ही हात सरळ होते, ती प्रसाद घेते. नुकतीच डॉक्‍टरांची भेट झाली असता, ती म्हणाली, "मैनै भगवान को नहीं देखा, लेकीन मेरे भगवान तो आपही हो....डॉक्‍टर साहब' ही बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करून डॉक्‍टरांच्या पायाकडे हात नेला. डॉ. शिंगाडे यांचेही डोळे पाणावले. रिशूच्या वडिलांनी डॉक्‍टरांचे आभार मानले.

विशेष असे की, रिशूच्या आई-वडिलांची राहण्याची, जेवणाची सोय केली. अल्पदरात शस्त्रक्रिया केली. औषधोपचार केला. पहिल्यांदा एका हातावर नंतर दुसऱ्या हातावर शस्त्रक्रिया केली. आता दोन्ही हात सरळ करते. गोल-गोल फिरवते. तिने डॉक्‍टर बनण्याची इच्छा व्यक्त केली. अशा एक नव्हेतर 176 मुलामुलींच्या हात आणि पायांवर शस्त्रक्रिया करून त्यांना सामान्य मुलांसारखे आयुष्य जगण्याची संधी त्यांनी दिली. डॉ. शिंगाडे यांनी शोधून काढलेल्या या अनोख्या शस्त्रक्रियेची जगातील वैद्यकशास्त्राने दखल घेतली. शल्यक्रिया अभ्यासक्रमात समाविष्ट केली. तर नुकतेच यूकेमध्ये एका डॉक्‍टरने अमायरा देवतळे या चिमुकलीवर ही शस्त्रक्रिया झाली. परंतु त्यात यूकेतील डॉक्‍टरांना यश आले नाही. यानंतर नागपुरात डॉ. शिंगाडे यांनी ही शस्त्रक्रिया केली. आता अमायरा ठणठणीत आहे.

अलनार सुफिनेशन फोरमतर्फे सत्कार
आयुष्यभर कोणाच्या वाट्याला अपंगत्व येऊ नये ही बाब लक्षात घेत डॉ. शिंगाडे यांनी जगभरातील अनेक मुलांच्या हातापायांचा वाकडेपणा दूर केला. या मुलांच्या पालकांच्या प्रयत्नातून तसेच चिल्ड्रन ऑर्थोपेडिक केअर इन्स्टिट्यूट आणि नागाई नारायणजी मेमोरियल फाउंडेशन रिसर्च विंग यांच्या सहयोगाने "अलनार सुफिनेशन फोरम' तयार करण्यात आला आहे. या फोरमची स्थापना रविवारी (ता. 22) नागपुरात होत आहे. भारतासाठी बॅडमिंटनमध्ये दोन सुवर्णपदके पटकावणारा अभिजित सखुजा तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेला डॉ. सुभास के. यांच्यावरही ही शस्त्रक्रिया झाली. यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

जन्माला येणाऱ्या एका लाखात दोन जण हातांच्या रेडिओ अलनार सायनोस्टोसिस या आजाराच्या विळख्यात सापडतात. 2 कोटींच्या महाराष्ट्रात 400 तर भारताच्या लोकसंख्येचा सरासरीने विचार केला तर आजघडीला देशात 25 हजारांहून अधिक चिमुकले या आजाराच्या विळख्यात अडकले आहेत. जागृती नसल्यामुळे मोजक्‍याच लोकांना या अपंगत्वावर मात करता येते, असे डॉ. विराज शिंगाडे म्हणाले.
- डॉ. विराज शिंगाडे, बाल अस्थिरोगतज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com