इरई नदीत कारसह युवक गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : काम आटोपून घरी जात असताना पुराचे पाणी वाहत असलेल्या पुलावरून त्याने कारसह जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारसोबत युवकही वाहून गेला. ही घटना शहराजवळील भटाळी-दुर्गापूर मार्गावर आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. कारसह वाहून गेलेल्या युवकाचे नाव सूरज बिपटे आहे.

ताडोबा मार्गावर असलेल्या भटाळी येथे वेकोलिची कोळसा खाण आहे. काही महिन्यांपूर्वी याच खाणीत सूरज नोकरीला लागला होता. सोमवारी रात्रीची शिफ्ट होती. आज सकाळी काम आटोपून तो कारने घराकडे जाण्यास निघाला. भटाळी गावाजवळील नदीवर एक पूल आहे. या पुलाची उंची अतिशय कमी आहे. मागील तीन दिवसांपासून इरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने पाण्याचा प्रवाह या पुलावरून सुरू आहे. अशात सूरजने या पाण्यातून कार काढण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो कारसह पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. घटनेची माहिती गावात पसरली. त्यानंतर प्रशासनालाही या घटनेची माहिती देण्यात आली. शोधमोहीम पथकाने घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. प्रशासनाने इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यापूर्वी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. वृत्त लिहीपर्यंत युवकाचा शोध सुरूच होता.
जिल्ह्यात पावसाची रिपरिप
मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी दुपारच्या सुमारास काहीवेळ पाऊस झाला. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the river Erai, a young man with a car passed by