ओव्हरलोड वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दैना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील वैनगंगा नदीवरील वाळूघाटांचा लिलाव झाला; परंतु, येथून क्षमतेपेक्षा जास्त वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रक-टिप्परमुळे रस्त्यांचे मात्र हाल झाले आहेत. या रस्त्याने इतर वाहन चालविणे कठीण झाले असून पायी जाणाऱ्यांनासुद्धा नीट चालता येत नाही. यासाठी कारणीभूत असणारे कंत्राटदार व चालक यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी पोलिस व महसूल प्रशासनसुद्धा दखल घेत नसल्याने पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बसफेऱ्या बंद पडल्या आहेत. यात विद्यार्थी व नागरिकांची फरपट होत आहे.

लाखांदूर तालुक्‍यातील वैनगंगा नदीवर मोहरणा, नांदेड, इटान या वाळूघाटांचे लिलाव प्रशासनकडून केले जातात. यावर्षी इटान येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. चौरास भागातील मोहरणा-विरली (बु.), मोहरणा-परसोडी, कुडेगाव ते दोनाड, इटान ते ते कऱ्हांडला, इटान ते विरली (बु.) या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील डांबरी रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. डांबराचा थर केव्हाच निघाला असून आता केवळ गिट्टी बाहेर डोकावताना दिसते. मागील वर्षीपासून दोनाड ते विरली खुर्दपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंजूर असून ते कासवगतीने सुरू आहे. इटान वाळूघाट सुरू असल्याने मुख्य मार्गावरील कऱ्हांडला येथून वाळू वाहतुकीचे ट्रक काढले जातात. काही दिवसांपूर्वी येथील वाळू कंत्राटदारांनी विरली (खुर्द) येथून ट्रक काढता येत नसल्याने पंधरा दिवस कऱ्हांडला मार्गे ट्रक टाकणे सुरू केले. या प्रकाराविरुद्ध इटान ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. सदस्य व उपसरपंचांनी विरोधी पवित्रा घेत या मार्गाने होणारी वाळू वाहतूक बंद करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तहसीलदारांना निवेदन देऊन केली होती. ट्रकमधून होणारी वाळूवाहतूक बंद झाली. मात्र, या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वर आलेली माती कायम आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road accidents due to overloaded sand transport