पानिपतच्या मुखातून निघाला विरत्वाचा हुंकार

राम चौधरी
मंगळवार, 14 जानेवारी 2020

यमुनेच्या काठावर कधीकाळी भिमथडी तट्टाचा संचार शत्रूच्या उरात धडकी भरवत होता. मात्र, पानिपताने मिळालेली जखम भळभळभती न राहता ती विरत्वाची निशानी म्हणून अभिमानाने मिरवावी असे क्षण याच पानिपताच्या मातीत अनुभवले गेले. निमित्त होते पानिपत शौर्यदिनाचे. 259 वर्षापूर्वी पानिपतावर शौर्यदिन जागविणाऱ्या विरांचे, त्या विरांच्या वारसांनी आपल्या पुर्वजांना वाहीलेल्या श्रध्दांजलीचे.

वाशीम: यमुनेच्या काठावर कधीकाळी भिमथडी तट्टाचा संचार शत्रूच्या उरात धडकी भरवत होता. मात्र, पानिपताने मिळालेली जखम भळभळभती न राहता ती विरत्वाची निशानी म्हणून अभिमानाने मिरवावी असे क्षण याच पानिपताच्या मातीत अनुभवले गेले. निमित्त होते पानिपत शौर्यदिनाचे. 259 वर्षापूर्वी पानिपतावर शौर्यदिन जागविणाऱ्या विरांचे, त्या विरांच्या वारसांनी आपल्या पुर्वजांना वाहीलेल्या श्रध्दांजलीचे.

पानिपत म्हटले की आजही महाराष्ट्राच्या अंगावर सरसररून काटा उभा राहतो. 259 वर्षापूर्वी मकर संक्रातीच्या दिवशी लाखो मराठा वीर धारातिर्थी पडले. लाखो जायबंदी झाले काही परागंदा झाले. पानिपताच्या जवळ असलेल्या जंगलात काहींनी आसरा घेतला. तब्बल दिडशे वर्ष जंगलात काढल्यानंतर इंग्रजी आमदनीत हे परागंदा झालेली मराठी शिलेदार रोड मराठा म्हणून बाहेर आले. याच मराठा शिलेदारांच्या वारसांची संख्या आता हरियाणात सहा लाखांच्या आसपास आहे. हेच वारस दरवर्षी 14 जानेवारीला पानिपत युध्द स्मारकाजवळ मराठा शौर्यदिन समारंभाचे आयोजन करतात. 

Image may contain: sky, tree, outdoor and nature

यावर्षीही लाखो मराठ्यांनी हा शौर्यदिन समारोह उत्साहाने साजरा केला. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मस्तानीच्या आठव्या पिढीचे वंशज नबाब शाबाद बहादूर, मुधोजीराजे भोसले, इतिहासकार डाॅ.वसंतराव मोरे मराठा जागृती मंच हरियाणाचे अध्यक्ष मराठा विरेंद्र वर्मा यांची उपस्थिती होती. सकाळी नऊ वाजता करनाल ते पानिपत तीस किलोमिटर रॅलीने या कार्यक्रमाला सुरूवात झाली. पानीपत, करनाल, कुरूक्षेत्र, सोनीपत या जिल्ह्यामधून लाखो रोडमराठा कालाआंब या शौर्यभूमीला नमन करण्यासाठी आले होते. 

प्रत्येक गावात वसतोय महाराष्ट्र 
पानिपत, सोनीपत, करनाल, कुरूक्षेत्र या चार जिल्ह्यामध्ये तब्बल साडेचारशे  खेड्यात रोड मराठा समाज वसलेला आहे. प्रत्येक गावाच्या प्रवेशदारावर छत्रपतींची प्रतिमा लावलेली आहे. हरियाणवी भाषेपेक्षा रोड मराठा समाजाच्या भाषेत बहुसंख्य मराठी शब्द आजही उच्चारले जातात.

Image may contain: 2 people, outdoor

परदेशातूशही उपस्थिती
या शौर्यभूमीला नमन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो मराठी बांधव उपस्थित होते. त्याबरोबरच बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान येथूनही मराठा बांधव उपस्थित होते. बाहेरून आलेल्या या मराठा बांधवांची चोख व्यवस्था येथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या रोड मराठा धर्मशाळेत केली गेली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road maratha celebrathe brave day at panipat