मुख्यमंत्र्यांचा शहरात शुक्रवारी रोड शो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी आपल्या पक्षातील नेत्यांना थांबविण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोझरी येथून महाजनादेश यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा शुक्रवारी 2 ऑगस्टला नागपुरात दाखल होईल. शहरात सहाही विधानसभा मतदारसंघात "रोड-शो' काढण्यात येईल. प्रमुख ठिकाणी स्वागत सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दिवशी काटोल आणि सावनेर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिदेत दिली.

बावनकुळे यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यातील सुमारे 150 हून अधिक विधानसभा मतदारसंघातून 4 हजार384 कि.मी.चा प्रवास करणाऱ्या या यात्रेचा मुख्य उद्देश राज्य सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यात्रेची सुरुवात 1 ऑगस्टला अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून होणार असून समारोप 1 सप्टेंबरला नाशिक येथे होणार आहे. नागपूर जिल्ह्यात ही यात्रा 2 ऑगस्टला वर्धामार्गे प्रवेश करेल. दुपारी 2 वाजता विमानतळ चौकात या यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळ चौक, सोमलवाडा, छत्रपतीनगर चौक,अजनी चौक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, संविधान चौक, लिबर्टी सिनेमा चौक, मेश्राम चौक, दर्गामंदिर, छावणी, एमएसईबी चौक व गिट्टी खदान चौक, तेथून कळमेश्वर, काटोलकडे रवाना होईल. तेथे साडेपाच वाजता जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री 8 वा. सावनेर येथे सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रेच्या पुढच्या प्रवासाला रवाना होईल. यात्रेसोबत भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी राहतील. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. पूर्व विदर्भाची जबाबदारी आमदार अनिल सोले यांच्याकडे तर पश्‍चिम विदर्भाची जबाबदारी अमरावतीचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road show on Friday in CM's city