यवतमाळ : डोळ्यांत मिरचीपूड टाकून शेतकऱ्याला लुटले

मोटरसायकल वरून पडल्यामुळे व डोळ्यात चटणी टाकल्याने वरून रात्रीचा अंधार फायदा घेत चोरट्यांनी पलायन केले
robbed farmer throwing pepper powder his eyes Yavatmal
robbed farmer throwing pepper powder his eyes Yavatmalsakal

ढाणकी : शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तीन लाख वीस हजार रुपये घेऊन लुटारू फरार झालेत बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मेट गाव येथील गणेश राठोड हा शेतकरी आपला GB कापूस विकण्या करीता दिनांक 24 मार्च रोजी फुलसांवगी येथील व्यापार पेठेत घेऊन गेले होते विकलेल्या कापसाचे 3 लाख 20 हज़ार रुपये घेऊन रात्री 8 वाजता निगनूर मार्गे आपले गाव मेट येथे येताना आचानक पणे निंगनूर घाटात दोघाजणांनी मोटरसायकल वरून येत डोळ्यात चटणी टाकली त्यामुळे गणेश भिकु राठोड व त्याचा सहकारी मित्र मोटरसायकल वरून खाली कोसळले चोरांनी पैस्यांची बॅग हिसकवण्याच्या प्रयत्न केला परंतु पैस्यांची बॅग खांद्यावर लटकवली असल्याने लवकर निघत नव्हती त्यामुळे चोरांनी हातापायी करत चाकूचा धाक दाखवत पैस्यांची बॅग हिसकावत नेली.

मोटरसायकल वरून पडल्यामुळे व डोळ्यात चटणी टाकल्याने वरून रात्रीचा अंधार फायदा घेत चोरट्यांनी पलायन केले . गावातील लोकांना घडलेल्या घटनेची माहिती देत चोर निगनूर दिशेने गेल्याने निगनूर पोलीस पाटील उत्तम मुडे यांना भेटून माहिती दिली पोलीस पाटील यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार प्रताप भोस यांना चोरीला गेलेल्या 3 लाख 20 रुपयांची माहिती दिली मिळालेल्या माहिती वरून ठाणेदार प्रताप भोस यांनी घटनास्थळ गाठत गणेश राठोड यांना बोलून घेत कश्याप्रकारे लूटमार झाली याची माहिती घेतली त्यावरून त्वरित तपास चक्र फिरवले परंतु लुटारू चोरांचा काही थांगपत्ता लागला नाही. गणेश राठोड यांच्या तक्रारी वरून अज्ञात लुटारू चोरांन विरुद्ध 392,34 अंतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शना खाली कपील मस्के बिट जमादार गजानन खरात जमादार रवी गीते पोलीस दत्ता कुसराम हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com