चिमूर तालुक्यात चोरीचे सत्र

chimur
chimur

चिमूर (चंद्रपूर) : कुटूंबाचे भरण पोषण आणी भविष्याची तरतुद म्हणुन आजही घरातच रोख रक्कम आणी सोने चांदीचे दागदागीने संग्रहीत करण्यात येतात. मात्र चिमूरमध्ये या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या चोरीच्या सत्रामुळे नागरीकांची झोप उडाली असून आपल्या संपत्तीच्या सुरक्षिततेविषयी असुरक्षा व भीती निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीपासून कागद विरहीत आर्थिक देवाण-घेवाण वाढविण्याकरीता बँका व शासन भर देत असून यामुळे रोख स्वरूपात देवाण घेवाण कमी झाली आणि कागद विरहीत व्यवहार वाढले आहेत . मात्र दैनंदिन खर्चाकरीता तसेच तातडीच्या व्यवहारासाठी पैसे घरी ठेवले जातात . तसेच दागिनेसुद्धा मोठ्या प्रमाणात घरी असलेल्या तिजोरी व कपाटात ठेवले जाते. मात्र चिमूर शहरात आणी परीसरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे या रोख रक्कमेची व दागदागिन्यांची सुरक्षा कशी करावी याची चिंता नागरीकांना लागली आहे.

चिमूर शहरातील गजबजलेल्या परिसरात आबादी येथील व्यवसायिक पप्पू शेख हे काही कामाकरीता 9 सप्टेंबरला बाहेर गावी गेले. 11 सप्टेबंरला सांयकाळी परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यात दागदागिने, हज यात्रेकरीता जमा केलेली रक्कम, आणि इतर मिळून तीन लाखाच्या जवळपास रक्कम चोरांनी लांबविली. 12 सप्टेंबरला वडाळा पैकु येथील रहिवाशी पंकज दिनेश शिरभय्ये काही कामानिमीत्त बाहेर गावी गेले तर इतर शेतात गेले होते शेतातुन सांयकाळी परत आल्यानंतर द्वाराचा कुलूप तुटलेले आणि कपाट सताड उघडे होते. रोख वीस हजार आणी दागिने असे एकुण 1 लाख 55 हजार रूपयाचा एवज चोरट्यांनी लंपास केला. याच वेळेस अपना मंगल कार्यलयाच्या मागे रहात असलेले नेत्र चिकित्सक डांगरे हे सांयकाळी घरी परत आल्या नंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले व त्यांनी ठेवलेले रोख चार हजार चोरट्याने लांबविले. अशा प्रकारे चोरीच्या सत्राने चिमूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिमूर शहरात मागील दोन वर्षात अनेक प्रकारच्या चोरीच्या घटना उघडीस आल्या. मात्र चिमूर पोलींसांना चोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. चोरीचा छ्डा लावून चोरांना गजाआड करण्यात अपयश आल्याने चोरांपुढे पोलीस यंत्रणा हतबल झाल्याची शहरात चर्चा असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आले आहे. आता नविन ठाणेदाराकडून नागरीकांच्या या विषयी अपेक्षा वाढलेल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com