पोलिसाच्या घरी, 66 हजारांची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

खापरखेडा (जि.नागपूर): रविवारी रात्री महाजेनेकोच्या प्रकाशनगर वसाहतीत चोरट्यांनी पाच घरे फोडल्याची माहिती जरी पोलिसांनी दिली असली तरी त्याच दिवशी एका पोलिसाचे घरही चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. चोरीच्या या घटनेमुळे प्रकाशनगर वसाहतीत दहशत पसरली आहे. प्रकाशनगर वसाहतीत पोलिसांना देण्यात आलेल्या क्वॉर्टरमध्ये राहणारे अलिम खान नागपूरला कार्यक्रमानिमित्त गेले होते. घरी कुणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 66 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी समोरील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटाच्या लॉकरमधून ऐवज लांबविला.

खापरखेडा (जि.नागपूर): रविवारी रात्री महाजेनेकोच्या प्रकाशनगर वसाहतीत चोरट्यांनी पाच घरे फोडल्याची माहिती जरी पोलिसांनी दिली असली तरी त्याच दिवशी एका पोलिसाचे घरही चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. चोरीच्या या घटनेमुळे प्रकाशनगर वसाहतीत दहशत पसरली आहे. प्रकाशनगर वसाहतीत पोलिसांना देण्यात आलेल्या क्वॉर्टरमध्ये राहणारे अलिम खान नागपूरला कार्यक्रमानिमित्त गेले होते. घरी कुणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 66 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी समोरील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटाच्या लॉकरमधून ऐवज लांबविला. अलिम खान घरी येताच कुलूप तुटलेले व सामान अस्ताव्यस्त दिसले. सदर घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्यासह रामेश्वर कटरे, नीलेश पिपरोदे, अंकुश चकोले पुढील तपास करीत आहेत. 
सीसीटीव्ही लावण्यासाठी मागणी 
प्रकाशनगर वसाहतीत खासगी सुरक्षारक्षक असतानाही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला तरी कसा, असा सवाल केला जात आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत व चोरट्यांचा सुगावा लागावा यासाठी प्रकाशनगर वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी मुख्य अभियंता खंडारे यांना केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The robbery of a policeman's house, 66 thousand