आमदारपुत्र रोहितसह तिघांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नागपूर - शंकरनगरातील क्‍लाऊड सेव्हन बारमध्ये संचालक सनी बम्रोतवारचा खून करण्याचा प्रयत्न करणारा आमदारपुत्र रोहित कृष्णा खोपडेसह त्याच्या तीन साथीदारांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रोहित खोपडे, गिरीश गिरधर आणि राहुल यादव अशी आरोपींची नावे आहेत. 

नागपूर - शंकरनगरातील क्‍लाऊड सेव्हन बारमध्ये संचालक सनी बम्रोतवारचा खून करण्याचा प्रयत्न करणारा आमदारपुत्र रोहित कृष्णा खोपडेसह त्याच्या तीन साथीदारांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रोहित खोपडे, गिरीश गिरधर आणि राहुल यादव अशी आरोपींची नावे आहेत. 

20 नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता क्‍लाऊड सेव्हन बारमध्ये आमदारपुत्र अभिलाष आणि रोहित, त्यांचे साथीदार अक्षय खांडरे, गिरीश गिरीधर, राहुल यादव, शुभम महाकाळकर, अक्षय लोंढे, मोहसीन खेडीकर, स्वप्निल देशमुख आणि त्यांचे तीन ते चार साथीदार दारू पिण्यास गेले. दारू ढोसल्यानंतर अभिलाषने आमदारपुत्र असल्याचे सांगून बिलामध्ये डिस्काउंट देण्याची मागणी केली. बारमालक सनीने त्यास विरोध केला. त्यामुळे अभिलाष आणि रोहितने साथीदारांच्या मदतीने बारमध्ये तोडफोड केली. सनीवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर लक्ष्मीभुवन चौकात धिंगाणा घालत असताना सनीचे वडील प्रमोद बम्रोतवार, भाऊ शोभित आणि त्याच्या साथीदारांनी शुभम महाकाळकरचा तलवारीने खुपसून खून केला. याप्रकरणी प्रमोद आणि शोभितसह बम्रोतवार टोळीतील काही आरोपींना अटक केली. मात्र, अभिलाष आणि रोहित खोपडेसह अन्य आरोपी पोलिसांसोबत लपंडाव खेळत होते. शेवटी आमदार कृष्णा खोपडे अभिलाष, रोहित, अक्षय खांडरे, गिरीश गिरीधर आणि राहुल यादव यांच्यासह रविवारी रात्री अकरा वाजता अंबाझरी पोलिस ठाण्यात पोहचले. 

अभिलाष मेडिकलमध्ये 
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य आरोपी अभिलाष खोपडे पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र, आज सकाळी प्रकृती बरी नसल्याचे सांगितल्याने त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच जखमी असलेला आरोपी अक्षय खांडरे याची प्रकृती बरी नसल्याने त्याला सूचनापत्र देऊन चौकशीसाठी वेळोवेळी ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश पोलिसांनी दिले. 

तिघांची तुरुंगात रवानगी 
सनी बम्रोतवारचा खून करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय लोंढे, मोहसीन खेडीकर आणि स्वप्निल देशमुख या आरोपींची न्यायालयीन कोठडीत म्हणजेच मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तीन दिवसांपूर्वीच त्यांना अटक केली होती.

Web Title: Rohit police custody