163 शाळांमधील छताला गळती

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : शासनाकडून एकीकडे डिजिटल शाळा, खासगी शाळांप्रमाणे दर्जदार शिक्षण देण्याची भाषा करण्यात येत असताना दुसरीकडे सरकारी शाळांची पार दुरवस्था असून पावसाच्या पाण्यात शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल 163 शाळांमधील छताला गळती असल्याने विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या 1535 शाळा आहेत. यातील अनेक शाळांची दुरवस्था आहे. अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. डिजिटल शाळांची गोष्ट होत असली तरी त्यासाठी आवश्‍यक साधे इंटरनेट नाही. अनेक शाळांमध्ये तर साधा फोनही नसल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे अशा स्थितीत सरकार ग्रामीण भागातील सरकारी शाळांची खासगी शाळांसोबत स्पर्धा करण्याची भाषा करीत आहे. सरकारच्या या भाषेवर आता हसण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. तर काळी भागात संततधार पाऊस होता. या पावसाने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दर्जेदार इमारती आणि छतांची पोलखोल केली. जिल्ह्यातील 163 शाळांमधील छता गळती असल्याची बाब समोर आली. यात सर्वाधिक शाळा या रामटेक तालुक्‍यातील आहे. त्या पाठापोठ उमरेड आणि पारशिवनी आणि सावनेर तालुक्‍यातील शाळा आहेत. अतिवृष्टीमुळे नरखेड तालुक्‍यातील एका शाळेची सुरक्षा भिंत आणि उमरेडमधील एका शाळेचे स्वच्छतागृहाची इमारत पडली. या शाळेतील छतांच्या तसेच स्वच्छतागृह आणि सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी 93 लाख 22 हजारांचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे.

मंदिरात भरते शाळा

नरखेड येथील एका ग्रामपंचायतमध्ये चक्क मंदिरात शाळा भरत असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे 1 ते4 वर्ग आहेत. पहिली आणि दुसरीचा वर्ग मंदिरात भरते. तर तिसरी आणि चौथीचा वर्ग एकाच खोलीत भरत असल्याचे सांगण्यात येते. येथे शाळा करता इमारत मंजूर करण्यात आली. मात्र बांधकाम आणि शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून अडथळा घालण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com