शिधापत्रिकांसाठी चकरा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

सालेकसा(गोंदिया) : सामान्य नागरिकांच्या सुविधेकरिता शासन विविध योजना राबवीत आहे. नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा, याकरिता तहसील कार्यालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या नाहीत. तालुक्‍यातील अनेक गावांतील गरजू 150 लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका नाही. गेल्या दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. ताबडतोड नवीन शिधापत्रिका कार्ड देण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. 

सालेकसा तालुक्‍यात 92 गावांचा समावेश आहे. येथील लोकसंख्या एक लाख आहे. नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून तहसील कार्यालय इमारत उभारण्यात आली आहे. तालुक्‍यातील सुमारे 150 कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही. लाभार्थ्यांनी नवीन शिधापत्रिका बनविण्याकरिता संबंधित कार्यालयात रीतसर अर्ज केले आहे. मागील दोन महिन्यांचा काळ लोटला असून, अद्याप लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका तयार करून देण्यात आल्या नाहीत. अनेक गावांतील नागरिक दररोज 16 ते 20 किलोमीटर अंतर गाठून तहसील कार्यालयातून आल्यापावली परत जातात. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परिणामी, नवीन शिधापत्रिका नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना अन्नपुरवठा करीत नाहीत. त्यामुळे लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहत असून, काही लाभार्थ्यांची आवश्‍यक कामेही अडल्याने चांगलेच अडचणीत सापडले आहे. दरम्यान, त्वरित नवीन शिधापत्रिका देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. 

शिधापत्रिका असणे बंधनकारक 
विविध योजनांच्या लाभाकरिता शिधापत्रिका बंधनकारक असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, विद्युत मीटर, जाती प्रमाणपत्र व इतर कामांकरिता आवश्‍यक आहे. मात्र, जेव्हापासून नवनिर्मित तहसील कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण झाले, तेव्हापासून लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या नाही, असे बोलले जाते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A roundabout for educators

टॅग्स