आरपीआय(अ), भाजपमध्ये जागाबाबत चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - महायुतीचा घटक असलेल्या आरपीआय (अ) व भाजपमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जागासंदर्भात चर्चा झाली. या वेळी भाजपकडून शहराध्यक्ष आमदार सुधार कोहळे व आमदार अनिल सोले, तर आठवले गटाकडून बाळू घरडे आणि भीमराव कांबळे हे उपस्थित होते. 

विशेष म्हणजे आठवले गटाच्या शहराध्यक्षपदावरून घरडे यांना पायउतार करून राजन वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना घरडेंनी वाटाघाटी केल्याने ते समांतर गट चालवित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

भाजपच्या गणेशपेठ कार्यालयात जागेबाबत चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली. शुक्रवारला पुन्हा बैठक होणार आहे. शनिवारला जागांबाबत अहवाल आणि नावांची यादी देण्यात येईल, असे बाळू घरडे यांनी सांगितले. बैठकीला भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुख धर्मपाल मेश्राम, रिपाइंच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रजनी वासनिक, बंटी अलेक्‍झांडर, सुधीर नारनवरे, सागर मानकर, वीरेंद्र मेश्राम, राहुल मेश्राम आदी उपस्थित होते.

Web Title: RPI, BJP discussion about the election seat