रिपब्लिकन नेते रामटेके यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नागपूर - गेल्या पाच दशकांपासून रिपब्लिकन चळवळीतील नेते उमाकांत रामटेके (वय 82) यांचे आज येथील निवासस्थानी निधन झाले.

नागपूर - गेल्या पाच दशकांपासून रिपब्लिकन चळवळीतील नेते उमाकांत रामटेके (वय 82) यांचे आज येथील निवासस्थानी निधन झाले.
डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कॉस्ट फेडरेशनमध्येही रामटेके यांनी काम केले. 1956 च्या धम्मदीक्षा सोहळ्यात ते कार्यकर्ता म्हणून उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. रिपब्लिकन ऐक्‍यासाठी ते नेहमीच पुढे असत.

त्यांचे कार्य पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी आहे. गेल्या पाच दशकांपासून पदाची अपेक्षा न ठेवता रामटेके यांनी एकनिष्ठ राहून रिपब्लिकन चळवळीत काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन कार्यकर्त्यांची एक पिढी तयार झाली. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील भूमिहीनांच्या सत्याग्रहात रामटेके यांनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात नऊ दिवसांचा कारावास भोगला होता.

Web Title: RPI leader umakant ramteke death

टॅग्स