कुकरेजा यांच्यापुढे 2,946 कोटींचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नागपूर - स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी सभागृहात सादर केलेल्या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे स्रोत नमूद करताना जीएसटी, विविध योजनांचे अनुदान, खासदार, आमदारांकडून मिळणारे अनुदान, शासनाचे विशेष अनुदान कर्जातून एकूण 1,529 कोटी येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र, एकूण अंदाजपत्रकापैकी शिल्लक 1,417 कोटींच्या वसुलीसाठी नियोजनाचे स्वरूप स्पष्ट नसल्याने "संकल्प'पूर्तीचे मोठे आव्हान कुकरेजा यांच्यापुढे राहणार आहे. 

अर्थसंकल्पीय भाषणात कुकरेजा यांनी जीएसटी, योजनांच्या अनुदानातून 823.68 कोटी, आमदार, खासदार व विशेष अनुदानातून 412.32 कोटी, तर 284 कोटींचे कर्ज घेण्यात येणार असल्याचे नमूद केले. इतर 1,417 कोटींसाठी त्यांनी महापालिकेतील पारंपरिक स्रोतांचा विचार केला. परंतु, आतापर्यंत पारंपरिक स्रोताचा विचार केल्यास स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील दावे अधिकाऱ्यांनी फोल ठरविल्याचे दरवर्षी मार्चअखेर दिसून येते. 

मागील वर्षी संदीप जाधव यांनी 2,266 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, मार्चअखेर 1747.55 कोटींचीच वसुली झाली. अर्थात मागील वर्षी अर्थसंकल्पातील लक्ष्यांच्या तुलनेत झालेली वसुली 77 टक्के आहे. वीरेंद्र कुकरेजा यांनी मालमत्ता कराच्या वसुलीतून 509 कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मागील वर्षी दोनशे कोटींपेक्षाही कमी उत्पन्नाची वसुली झाली. नव्या वर्षात आणखी दीड लाख नागरिकांच्या मालमत्तांचे मूल्यांकन होऊन त्यातून मालमत्ता कर वाढेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. तीनशे कोटींची भर त्यातून पडेल, असा आत्मविश्‍वास त्यांनी भाषणातून व्यक्त केला. 

Web Title: Rs 2946 crore challenge to Kukreja