संघ व महानुभाव पंथाचे कार्य एकमेकांना पूरक : डॉ. भागवत

file photo
file photo

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व महानुभाव पंथाचे कार्य एकमेकांना पूरक असून दोघांचीही नाळ घट्ट जुळलेली आहे. धर्म संस्कृतीच्या रक्षणाचे हे कार्य असेच अविरत पुढे सुरू राहील, असा विश्‍वास व्यक्त करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला.
शहरातील कंवरनगर येथील महानुभाव आश्रमात आज, मंगळवारी सकाळी डॉ. भागवत यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी आश्रमाचे नवे उत्तराधिकारी आचार्य मोहनराजदादा कारंजेकर (अमृते) यांची भेट घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान केला. त्यानंतर आचार्य मोहनराजदादा यांनी सरसंघचालक डॉ. भागवत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. याचवेळी महंत येळमकरबाबा, महंत यक्षदेवबाबा यांचा डॉ. भागवत यांनी सत्कार केला. याप्रसंगी महंत नांदेडकरबाबा, पैठणकरबाबा, पाचराऊतबाबा, वाईंदेशकरबाबा, जयराजबाबा, विश्‍वनाथबाबा, कान्हेराजबाबा, चिरडेबाबा, तळेगावकरबाबा, सोनपेठकरबाबा, संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, अमरावती विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, महानगर संघचालक सुनील सरोदे, नगर संघचालक अविनाश चुटके, श्‍याम निचित, विभाग कार्यवाह शिवा पिंपळकर, महानगर कार्यवाह संजय गुळवे व अन्य मंडळी उपस्थित होती.
डॉ. भागवत म्हणाले, संघ व महानुभाव पंथाला जोडण्याचे कार्य स्व. दादाराव भडके यांनी केले. कार्याची दिशा स्पष्ट असल्यामुळे संबंध वृद्धिंगत होत गेले. संत व संघाचे आध्यात्मशक्तीचे हे कार्य व्यापक स्वरूपात जोमाने सुरू राहील.
आचार्य मोहनराजदादा म्हणाले की, मोठे कारंजेकरबाबा निघून गेल्याने आम्ही पोरके झालो. महानुभाव व संघाचे संबंध स्व. दादाराव भडके यांच्यामुळे जुळले. ते पण आता निघून गेले. आमची नाळ जुळलेली आहे. संघशक्ती पाठीशी असल्यामुळे काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळते. महानुभाव पंथ राष्ट्रहितासाठी संघासोबत सदैव कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भेटीच्या या छोटेखानी कार्यक्रमानंतर डॉ. भागवत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com