करकरेंनी जुलूमाचे पाप का केले; संघ नेते इंद्रेश कुमारांचा साध्वींना पाठिंबा 

Indresh Kumar
Indresh Kumar

इंदिरानगर (नाशिक) : साध्वी प्रज्ञासिंह यांनी अत्याचारांना वाचा फोडली तर, त्यात वावगे काय आहे? महिलेवरील असे अन्याय शोभनीय नाहीत. देशात महिलांवर अत्याचार होण्यास सहमती द्यावी काय? हेमंत करकरे देशभक्त असतील; पण त्यांनी हे जूलूम करण्याचे पाप का केले?, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते इंद्रेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. 19) येथे उपस्थित केला. 

पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचतर्फे झालेल्या समरसता संदेश कार्यक्रमात ते बोलत होते. न्यू भारत फाउंडेशनच्या राष्ट्रीय सरचिटणीस रेश्‍मा सिंग, चित्रपट निर्माते अभिनवसिंह कश्‍यप, वाराणसी विद्यापिठाचे प्रा. डॉ. राकेशकुमार उपाध्याय, शिल्पी अवस्थी आदी व्यासपीठावर होते. 

इंद्रेशकुमार म्हणाले की, देशाने साध्वी प्रज्ञासिंहचे दु:ख समजून घेतले पाहीजे. या अत्याचाराचे समर्थन करणाऱ्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी मिळावी का? संबंधित पक्षांची मान्यतादेखील रद्द केली पाहीजे. जनतेने हा प्रश्‍न मांडला, तर चुकीचे काय आहे. देशाने महिलांवरील अत्याचार सहन करता कामा नये. मूकपणे देश हे कसे बघू शकतो? 
""देश बदलत आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. एका सर्जिकल स्ट्राईकमुळे देश 70 वर्षात पहिल्यांदा मुक्तपणे हसला. दहशतवादी कारवायांच्या संदर्भात जगभरातील 117 देशांचा पाठिंबा या सरकारने मिळवला. कॉंग्रेसने देश स्वतंत्र केला नाही, तर त्याचे तुकडे केले, हे लक्षात घेतले पाहीजे,'' असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com