आरएसएस म्हणजे "रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस'

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर: नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या भारतीयांना सहकार्य करणे संघ स्वयंसेवक आपले कर्तव्य समजतो. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे संघ देत नसला तरी त्याला शाखेतील नित्यसाधना राष्ट्राप्रती समर्पित होण्याची प्रेरणा देते. म्हणून जगाला संघ म्हणजे "रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस' वाटत असल्याचे मत महानगर बौद्धिकप्रमुख रवींद्र सहस्रबुद्धे यांनी व्यक्‍त केले आहे.
बुधवारी संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचे विजयादशमी उत्सव सहा ठिकाणी झाले. नंदनवन येथील उत्सवात रवींद्र सहस्रबुद्धे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश मुक्‍कावर उपस्थित होते. व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे व नंदनवन भाग संघचालक अशोक उजवणे उपस्थित होते. शस्त्रपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे कौतुक करताना, संस्कृतमधील आज्ञांवर झटपट प्रात्यक्षिके सादर करणारे स्वयंसेवक पाहून भारावलो असल्याचे मत डॉ. गणेश मुक्‍कावार यांनी व्यक्‍त केले. संघ देश पुढे नेण्यात सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.
बिनाकी, सदर व गिट्टीखदान भागाचा संयुक्‍त कार्यक्रमात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हिमांशू दुवा प्रमुख अतिथी होते. संघाचा स्वयंसेवक भारतात सर्वोच्च पदावर विराजित झाला असला तरी, स्वत:ची ओळख स्वयंसेवक अशीच देत असल्याचे मत दुवा यांनी व्यक्‍त केले. संघ शाखा व्यक्‍ती निर्माणाचे केंद्र असल्याचे ते म्हणाले.
इतवारी व लालगंज भागातील कार्यक्रमात डॉ. कुश झुणझुणवाला प्रमुख पाहुणे होते. त्यांनी प्लॅस्टिकमुक्‍तीचा संदेश दिला. वेळेवर जेवण व वेळेवर अभ्यास करावा, फास्ट फूडपेक्षा घरच्या अन्नाचे सेवन करण्याचे आवाहन त्यांनी केले. धरमपेठ, त्रिमूर्ती व सोमलवाडा भागाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉ. अभय दातारकर प्रमुख अतिथी होते. त्यांनी बाल स्वयंसेवकांना संघस्थानावरील मातीतील खेळ बिनधास्त खेळण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृतीशी वैज्ञानिक सांगड अशी शक्‍य आहे. यासंदर्भात त्यांनी भाष्य केले.
अजनी, अयोध्यानगर भागाचा संयुक्तिक कार्यक्रमात सनदी लेखापाल सूचित हरिभाऊ उस्केलवार प्रमुख पाहुणे होते. यावेळी मंचावर महानगर सहकार्यवाह उदय वानखेडे, डॉ. रमाकांत कापरे उपस्थित होते. संघ देशात संस्कृती आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यात संघशाखांची मोलाची भूमिका असल्याचे मत हरिभाऊ उस्केलवार यांनी व्यक्‍त केले. तर शक्तीची पूजा करण्यासाठीच विजयादशमी उत्सव असल्याचे मत उदय वानखेडे यांनी व्यक्‍त केले. आभार प्रदर्शन अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ यांनी मानले.

शिस्तबद्ध संचलन
सहा भागांत आयोजित करण्यात आलेल्या उत्सवापूर्वी बालस्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलन केले. परिसरातील नागरिकांनी रांगोळ्या व पुष्पवृष्टीद्वारे स्वयंसेवकांचे स्वागत केल्याने, संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

स्वयंसेवकांचे सादरीकरण
विजयादशमी उत्सवात बाल स्वयंसेवकांनी वंशीच्या स्वरात बाल स्वयंसेवकांनी कवायत, नियुद्ध, मानवी मनोरे, घोष व दंड व्यायाम योगाच्या सादरीकरण केले. हे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com