ज्यांना राममंदिर हवे, त्यांनी सहभागी व्हावे! - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

नागपूर - संघ परिवारातर्फे राम मंदिर उभारण्यासाठी व्यापक अभियान उभारणार असून, नागपुरात होणाऱ्या हुंकार सभेशी भाजपचा संबंध नाही. ज्यांना राम मंदिर व्हावे असे वाटत असेल, त्यापैकी कुणालाही व कुठल्याही पक्षाच्या आमदाराला त्यात सहभागी होता येईल. त्याकरिता आम्ही भाजपच काय तर काँग्रेसच्याही आमदाराला मनाई करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

संघ परिवारातर्फे २५ नोव्हेंबरला राम मंदिरासाठी विशाल जनजागरण हुंकार सभा आयोजित केली आहे. त्याची जबाबदारी भाजपच्या आमदारांवर सोपविण्यात आली आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी प्रत्येक हिंदूची मनोमन इच्छा आहे. कोणाच्याही इच्छेला आवर घालता येत नाही. पक्षाचे बॅनर किंवा नाव घेऊन यात सहभागी होण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधींना सांगण्यात आले नाही. मात्र, इच्छेनुसार ज्यांना राम मंदिरासाठी कार्य करायचे आहे, त्यांना मनाई नाही. अगदी काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने यात सहभाही होण्याची तयारी दर्शविली तरी हरकत नाही. फक्त या आंदोलनाशी भाजपचा कुठलाही संबंध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुनगंटीवारांचा दोष नाही
अवनी नरभक्षक झाल्यानेच तिला ठार मारण्यात आले. त्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कुठलाही दोष नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी या वन्यप्राणी प्रेमी आहेत. त्या आपली भूमिका आक्रमकपणे मांडत असतात. माझ्यावरही त्यांनी अनेकदा टीका केली. वाघिणीला मारल्याची चौकशी करण्यात येणार आहे. खरोखरच चुकीच्या पद्धतीने अवनीला मारल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल. चौकशीनंतर जे काही समोर येईल ते आम्ही स्वीकारू, असे सांगून नितीन गडकरी यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस यांनीदेखील मुनगंटीवार यांची पाठराखण केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Rammandir Chief Minister