अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध आरटीओ विभागाची मोहीम

RTO department campaign against illegal passenger traffic
RTO department campaign against illegal passenger traffic

मोताळा (बुलडाणा) : ऑटोरिक्षा चालकांसह वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, याबाबत मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य यांनी गुरुवारी (ता.30) मोताळा व शेलापूर येथे ऑटोचालकांचे समुपदेशन केले. दरम्यान, नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाशिककडील मालेगावनजीक एसटी बस, ऍपेरिक्षाच्या भीषण अपघातात अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त एसटी बस व ऍपेरिक्षा विहिरीत कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. मंगळवारी दुपारी हा भीषण अपघात घडला. दरम्यान, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलडाणा यांनी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, महसूल सुरक्षा पथक वाहन चालक भिकाजी मेढे यांनी मोताळा व शेलापूर येथील ऑटोरिक्षा स्थानकावर जाऊन ऑटोरिक्षा चालकांमध्ये जनजागृती केली. त्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले. दरम्यान, अवैध प्रवासी वाहतूक व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताची शक्‍यता बळावते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अवैध प्रवासी वाहतूक व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये, अशी सूचना दिली. अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध आरटीओ विभागाने मोहीम उघडली असून, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील ऍपेरिक्षा व ऑटोरिक्षा चालकांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com