esakal | हॅलोऽऽ शिंगरू गावात चितळाचे मांस शिजत आहे; वनविभागाने भाजीच ताब्यात घेतली, पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

Rumors of deer being hunted in Manora

भद्रावती वनपरिक्षेत्राअंतर्गत मानोरा शिंगरू हे गाव येते. या गावातील एकाने शुक्रवारी (ता. १८) चितळाची शिकार केल्याची माहिती मिळाली. त्याचे मांस भोगेकर यांच्या घरी शिजविण्यात येत असल्याची माहिती वनविभागाला हेल्पलाइन नंबरवरून देण्यात आली.

हॅलोऽऽ शिंगरू गावात चितळाचे मांस शिजत आहे; वनविभागाने भाजीच ताब्यात घेतली, पुढे

sakal_logo
By
रवी जीवने

एकतानगर (जि. चंद्रपूर) : भद्रावती वनपरिक्षेत्राअंतर्गत मानोरा शिंगरू हे गाव येते. या गावातील एकाने शुक्रवारी (ता. १८) चितळाची शिकार केल्याची माहिती मिळाली. त्याचे मांस भोगेकर यांच्या घरी शिजविण्यात येत असल्याची माहिती वनविभागाला हेल्पलाइन नंबरवरून देण्यात आली. हेल्पलाइनहून माहिती मिळाल्याने वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने मानोरा शिंगरू या गावात पोहोचले. पाहतात तर ्काय...

प्राप्त माहितीनुसार, कुणीतरी हेल्पलाइनहून वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना चितळाची शिकार करून मांस शिजत असल्याची माहिती  दिली. माहिती मिळताच पथक तातडीने मानोरा शिंगरू या गावात पोहोचले. गावात गेल्यागेल्या त्यांनी भोगेकर यांचे घर गाठले.

जाणून घ्या - मुंबई-पुण्याला जायचं, नो टेन्शन!, उद्यापासून ही लांब पल्ल्याची  सेवा होणार सुरू

भोगेकर यांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यांच्या घरी शिजत असलेल्या चुलीकडील भांड्याकडे वनाधिकाऱ्यांचे लक्ष गेले. वनविभागाने चुलीवर शिजत असलेली भाजीच ताब्यात घेतली. घरात काही अजून साहित्य मिळते का याचीही त्यांनी चौकशी केली. मात्र, हाती काहीच आले नाही.

वनविभागाने भोगेकर यांना भाजीसह वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. कार्यालयात मांसाचे परीक्षण केले. तेव्हा भाजीत कोंबडीचे मांस आणि पाय आढळून आले. ते चितळाचे मांस नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भोगेकर यांना सोडण्यात आले. मात्र, चुकीच्या माहितीमुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. या घटनेची चर्चा तालुक्‍यात चांगलीच सुरू आहे.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

चितळाचे नव्हे तर कोंबडीचे मांस

वनपरिक्षेत्रातील एका गावात चितळाचे मांस शिजत असल्याची गुप्त माहिती वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक त्या गावात पोहोचले. ज्यांच्या घरी मांस शिजत होते, त्याच्या घराची झाडाझडती घेतली. झडतीत घरात चितळाच्या मांसाऐवजी कोंबडीचे मांस निघाले. माहितीच चुकीची असल्याने वनविभागाचे पथकही रिकाम्या हाताने परतले.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image