धावती आलिशान कार जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

महागाव (जि. यवतमाळ) : माहूर येथील देवीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या धावत्या आलिशान कारने पेट घेतला. बघता-बघता कार जळून खाक झाली. ही घटना सोमवारी (ता. पाच) रात्री सव्वानऊदरम्यान नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील खडका फाट्यावरील फ्लायओव्हरनजीक घडली. 

नांदेड येथील शिवाजी वॉर्डमधील रहिवासी सुरेश गणेश पाटील यांनी अवघ्या चार दिवसांपूर्वी लॅंड रोव्हर ही सेकंडहॅंड आलिशान कार औरंगाबाद येथून विकत घेतली होती. ही कार बाजारपेठेत अत्यंत महागडी समजली जाते. नवीन कारची बाजार किंमत साधारणतः एक कोटीच्या घरात असल्याचे सांगितले जाते. सुरेश पाटील कारने आपल्या दोन मित्रांसह माहूर गडावर दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर नांदेडकडे परत जात असताना खडका फाट्याजवळ कारच्या बॉनेटमधून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. क्षणात कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही मित्र जीव वाचविण्यासाठी गाडीतून बाहेर पडले. नेमके काय करावे, हे कुणालाही सुचले नाही. तिन्ही मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. जवळपास दोन तास कार महामार्गावर आगीत धुमसत राहिली. औरंगाबाद येथून चार दिवसांपूर्वीच कार विकत घेतली होती. मूळ मालकाच्याच नावे वाहन असल्याची माहिती पाटील यांनी दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Run down the sloping car and burn it