'रन फॉर युनिटी' : नागपूरकरांनी दिला एकतेचा संदेश (फोटो)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानावरून सुरू झालेल्या या दौडला महापौर नंदा जिचकार आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. संपूर्ण देशामध्ये आज राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपा उपायुक्त महेश मोहिते, क्रीडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मीना जेटली, मनपाचे क्रीडाधिकारी पीयूष अंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर : नागपूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी आयोजित "रन फॉर युनिटी' एकता दौडमध्ये शेकडो नागपूरकरांनी सहभागी होऊन एकतेचा संदेश दिला. उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या दौडमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह खेळाडू, पोलिस जवान, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला. 

Image may contain: 6 people, people smiling

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानावरून सुरू झालेल्या या दौडला महापौर नंदा जिचकार आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. संपूर्ण देशामध्ये आज राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली होती.

No photo description available.

यावेळी मनपा उपायुक्त महेश मोहिते, क्रीडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मीना जेटली, मनपाचे क्रीडाधिकारी पीयूष अंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महापौर जिचकार व जिल्हाधिकारी ठाकरे यांनी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Image may contain: 4 people

त्यानंतर महापौरांनी दौडमध्ये सहभागी पोलिस दलाचे जवान, खेळाडू, प्रशासकीय कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ दिली. तीन किमी अंतराच्या या दौडमध्ये नागपूर जिल्ह्यातील सुमारे तीनशेवर विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यापीठ मैदानावरून सुरू झालेली ही दौड लॉ कॉलेज मार्गाने जाऊन विद्यापीठ मैदानावर समारोप झाला.

Image may contain: 4 people

यावेळी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या "सरदार पटेल-सचित्र जीवनी' पुस्तकाचे महापौर व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Run for Unity': Nagpurkar's message of unity