सात दिवसापासुन ग्रामीण बँकेची लिंक फेल

जितेंद्र सहारे 
बुधवार, 11 जुलै 2018

चिमूर : डीजीटल इंडिया अंतर्गत सर्व बँकाचे व्यवहार इंटरनेट प्रणीलीद्वारे होत असून यामुळे आर्थिक व्यवहार व देवान घेवान गतीमान झाले आहे. मात्र या सर्व यंत्रणामध्ये बिघाड आल्याने पुर्ण व्यवस्था कोलमडत असुन चिमूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेची मागील सात दिवसापासुन लिंक फेल झाल्याने ऐण हंगामाच्या काळात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बँकीग व्यवहार गतीशील होऊन पेपरलेस व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने शासण धोरणाप्रमाणे आणि रिझर्व बँकेच्या दिशा निर्देशांप्रमाणे बँकचे व्यवहार डिजीटल करण्यात आले. त्यामुळे शहरी, नोकरदार तसेच मोठया व्यापाऱ्यांचे व्यवहार गतीने व्हायला लागले. ग्रामीण अर्थव्यवस्था संपूर्ण शेतीवर अवलंबुन असून पिक लागवड आणि पेरणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे खते, बियाणे, आणि शेतमजुरी करीता पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी आणि नागरिकांची बँकामध्ये गर्दी वाढली आहे. मात्र, मागील सात दिवसांपासून चिमूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेची लिंक फेल झाल्याने शेतकरी व नागरीक विवंचणेत आहेत.

चिमूर येथील बहुतेक बँका आणि शासकिय कार्यालयामध्ये भारतीय दुरसंचार निगम द्वारा इंटरनेट सुविधा पुरविल्या जात आहे. दुरसंचार विभागाचे जाळे सर्वदुर पसरलेले असून झालेला बिघाड दुरुस्ती करण्याकरीता तज्ञ यंत्रणेअभावी बिघाड कुठे आणि कसा झाला हेच समजत नसल्याने दुरुस्ती करीता वेळ लागत आहे. तसेच आज सांयकाळी होईल किंवा उद्या सकाळपर्यंत व्यवस्था सुरळीत होईल असे उत्तर निगम कर्मचारी आणी अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. आणि याच प्रमाणे बँक शाखेचे अधिकारी ग्राहकांना सांगत असल्याने नागरीक शेतकऱ्यांच्या नाहक हेलपाट्या होऊन त्यांचा वेळ व श्रम ऐण हंगामाच्या काळात फुकट चालला आहे. यामुळे नागरिकांनी याचा जाब बँक अधिकाऱ्यांस विचारल्यानंतर अधिकारी हतबलता व्यक्त करीत आहेत.

Web Title: rural bank link fails from seven days