"ग्रामविकास'ने उडविला कामांचा"बार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांना मंजुरी देण्याचा धडाका सुरू झाला आहे. ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील 20 कोटी रुपयांच्या 410 कामांना मंजुरी दिली असून, रस्ते व विद्युतीकरणाच्या कामांना "ग्रीन' सिग्नल दिला आहे.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांना मंजुरी देण्याचा धडाका सुरू झाला आहे. ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील 20 कोटी रुपयांच्या 410 कामांना मंजुरी दिली असून, रस्ते व विद्युतीकरणाच्या कामांना "ग्रीन' सिग्नल दिला आहे.
निवडणुका डोळ्यापुढे ठेवून कामे मंजुरी करण्याच्या करण्याचा धडाका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. प्रलंबित व नवीन कामांना मंजुरी देवून आचारसंहितेपूर्वी त्यांची सुरुवात करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींचा आहे. काही दिवसांपूर्वीच 14 कोटींची आमदार निधीतील कामे मंजूर करण्यात आलीत. त्यानंतर आता ग्रामविकास विभागानेही अनेक कामांना मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील 410 कामे आली आहेत. त्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेकडील कामांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत जिल्ह्यात कामांचा धडाका सुरू होण्याची शक्‍यता आहे. 20 कोटींच्या निधीतून ग्रामीण भागातील विकासाकरिता मूलभूत सोयीसुविधा पुरविणाऱ्यावर हा खर्च केला आहे. परिणामी ग्रामीण भागातील रस्ते चकाचक होणार आहे.

हायब्रीड अन्युईटीत 354 किलोमीटरची कामे
ग्रामीण रस्त्यासह हायब्रीड अन्युईटीमध्ये तब्बल 354 किलोमीटरची कामे घेण्यात आली आहेत. यासाठी एक हजार 138 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यात 60 टक्के शासन, तर 40 टक्के निधी काम करणाऱ्यांचा राहणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे येणाऱ्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Rural development blows up' bar '