ठाण्याच्या छतावर प्लॅस्टिकचे आवरण

सतीश घारड
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

ठाण्याच्या छतावर प्लॅस्टिकचे आवरण
टेकाडी (नागपूर) : जिल्ह्यातील संवेदनशील शहर असलेल्या कन्हान येथील पोलिस ठाण्याची चर्चा सध्या शहरात गमतीच्या सुरात सुरू आहे. यामागचे कारणही तसेच आहे. पावसाचे पाणी पोलिस ठाण्याच्या आता गळू नये यासाठी इमारतीच्या छतावर प्लॅस्टिकचे आवरण चढविण्यात आले आहे. पोलिसा ठाण्यात येणारा प्रत्येकच व्यक्ती याची चर्चा करताना दिसतो.

ठाण्याच्या छतावर प्लॅस्टिकचे आवरण
टेकाडी (नागपूर) : जिल्ह्यातील संवेदनशील शहर असलेल्या कन्हान येथील पोलिस ठाण्याची चर्चा सध्या शहरात गमतीच्या सुरात सुरू आहे. यामागचे कारणही तसेच आहे. पावसाचे पाणी पोलिस ठाण्याच्या आता गळू नये यासाठी इमारतीच्या छतावर प्लॅस्टिकचे आवरण चढविण्यात आले आहे. पोलिसा ठाण्यात येणारा प्रत्येकच व्यक्ती याची चर्चा करताना दिसतो.
नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कन्हान ठाण्याला भेट दिली. यानंतर त्यांनी ठाण्यासाठी आरक्षित जागेची पाहणी केली. त्यांना नव्या जागेची पाहणी करण्यासाठी याच प्लॅस्टिकच्या आवरणाने प्रवृत्त केले असावे अशी चर्चा ठाण्यात व ठाण्याच्या बाहेर सुरू आहे. संवेदनशील कन्हान शहरासह आसपासच्या तीस गावांत कायदा व सुव्यवस्था या ठाण्यातूनच अबाधित राखली जाते. पोलिस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. मात्र, ज्या इमारतीमधून त्यांना कर्तव्याची प्रेरणा मिळेत त्याच इमारतीची अवस्था दिनवाणी झाली आहे. कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने कामाचा अधिक ताण सहन करणारे पोलिस कर्मचारी या इमारतीत काही काही सुखानेदेखील बसू शकत नाहीत.
ठाण्याच्या बांधकामासाठी कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला लागून असलेली जागा दोन वर्षाआधी आरक्षित करण्यात आलेली आहे.परंतु, अद्याप बांधकामाला ठिकाणा नसल्याने "ऑन ड्यूुटी 24 तास' असणाऱ्यांच्या डोक्‍यावर छप्पर कधी हा सवाल उभा झालेला आहे.
डीवायएसपी कार्यालय भाड्याच्या खोलीत
ठाण्यात जागाच नसल्याने कैद्यांना तत्काळ इतरत्र हलवावे लागते. पार्किंगसाठीच व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर लागलेली असतात. तर जप्त करण्यात आलेल्या वाहनांमुळे अनेकदा अडथळा निर्माण होतो. महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वेगळा कक्ष नाही. महत्त्वाच्या अनेक फायलींना उदळी लागली आहे. महिलांसाठी वेगळे स्वच्छतागृह नसल्याने त्यांचीही कुचंबणा होत आहे. याशिवाय कन्हान येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे कार्यालय भाड्याच्या खोलीत आहे.

Web Title: rural police station news