विदर्भातील पंढरी असलेल्या शेगावात भक्तांची मांदियाळी 

संजय सोनोने
सोमवार, 23 जुलै 2018

शेगाव : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत सकाळपासूनच शेगाव शहर  भाविकांनी गजबजून गेले.शेगावात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु असतांना सुद्धा भक्त भरपावसात श्रीच्या दर्शनासाठी रांगा लावीत आहेत.

सध्या शेतात विविध कामे असल्याने इच्छा असतांना सुद्धा अनेकांना पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाईन शक्य न झाल्याने विदर्भातील हजारो भाविकांनी विदर्भाचे पंढरपूर म्हणून ही ओळखल्या जाणाऱ्या संत नागरी शेगावात पोहचून आज श्री चरणी माथा टेकला. यामुळे संत नगरी शेगाव शहर गर्दीने फुलून गेले होते. आषाढी एकादशीनिमित्त श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात असलेल्या श्री विठ्ठल -रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भक्तजणांचा मेळा तेथे जमतो. या निमिताने आज शेगावात भाविकांची तुफान गर्दी होती..शेगावात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु असतांना सुद्धा भक्त भरपावसात श्रीच्या दर्शनासाठी रांगा लावीत आहेत.

रेल्वेस्थानक, बसस्थानक व शहरातील रस्त्यांवर भाविकांनी एकच गर्दी केली होती. सकाळ पासून शहरात येणाऱ्या रेल्वे गाड्या भाविकांनी भरलेल्या होत्या. यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

Web Title: rush in shegao on the occasion of ashadhi ekadashi