"त्या' बैठकीचे सीईओंनी मागविले स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नागपूर : प्रशासक असताना माजी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेतली होती. अधिकाऱ्यांनी कक्ष खुले करून देत बैठकीला हजेरी लावली होती. विभागप्रमुखांची उपस्थिती नियमबाह्य असतानाही कुणाच्या परवानगीने त्यांनी उपस्थिती लावली, याची गंभीर दखल मुंबईहून परतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी घेतली आहे. यादव यांनी संबंधित विभागप्रमुखांकडून या प्रकरणाचे स्पष्टीकरण मागविल्याची माहिती आहे.

प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने खळबळ उडाली आहे. असा प्रकार घडला असल्यास ही गंभीर बाब असल्याचे मत यादव यांनी व्यक्त केले आहे. या बैठकीला कोणते विभागप्रमुख उपस्थित होते, त्याची माहिती काढणे सुरू आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी चर्चा आहे. प्रसार माध्यमांत वृत्त येताच विभागप्रमुखांत चांगलीच धुसफूस झाली. बैठकीची बातमी कोणी फोडली, यावरून विचारणा सुरू झाली. माजी सदस्यांना थेट अध्यक्षांचे ऍण्टी कॅबीन उघडून देणे आणि त्यात तब्बल तीन तास बैठकांचा खल करणे आणि विभागप्रमुखांनीही आढावा देण्याचा प्रकार प्रशासकीय संहितेचा भंग ठरणारी आहे. त्यांचा प्रकार हा जिल्हा परिषद संहितेलाच गालबोट लावणारा आहे. त्यामुळे सेवा, वर्तणूक कायद्याचा हा भंग आहे. प्रसार माध्यमांचे वार्तांकन गंभीरपणे घेऊन यादव यांनी संबंधितांना खुलासा मागितला आहे. सोमवारी त्यांच्याकडून सीईओंना स्पष्टीकरण सादर होणार असल्याची चर्चा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "That 's the CEO of the meeting Clarification sought