सचिन नाईक यांच्यावर कॉंग्रेस संघटनेची जबाबदारी

दिनकर गुल्हाने
शुक्रवार, 19 जुलै 2019

पुसद (जि. यवतमाळ) : राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात बस्तान मांडलेल्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांऐवजी प्रगल्भ व बुद्धिमान युवा नेतृत्वाला वाव देण्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानंतर नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राहुल ब्रिगेडचे युवा कार्यकर्ते तथा पुसद येथील ऍड. सचिन उत्तमराव नाईक यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश निवडणूक समिती, समन्वय समिती व प्रचार समिती अशी तिहेरी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कॉंग्रेस पक्षात तळागाळात काम करताना सचिन नाईक यांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांचा विश्वास संपादन केल्याने पक्षाने त्यांच्यावर पक्षबांधणीची धुरा सोपविली आहे. सचिन नाईक यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचे "ग्रास रूट'वर काम केले आहे. प्रियांका गांधी यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेश प्रांताची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी सचिन नाईक यांचा आपल्या चमूत समावेश केलेला होता. लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी परदेश दौरा केला. या दौऱ्यावरून परत येताच त्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 12 जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी रणनीती आखली असून, महाराष्ट्रातील सचिन नाईक यांच्यासह बाजीराव खाडे व जुबेर खान या तीन सचिवांसोबत नुकतीच बैठक घेतली. हे तिन्ही सचिव ब्लॉक, सेक्‍टर व बूथस्तरावर कार्यकर्त्यांना भेटणार असून, कोणता उमेदवार सक्षम राहील व निवडणूक कशी जिंकता येईल, याबद्दल चर्चा करून प्रियांका गांधी यांना अहवाल सादर करणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Naik is responsible for the Congress organization