सचिन तेंडुलकरला पाहायचा आहे वाघ, चार दिवस ताडोब्याच्या दौऱ्यावर

sachin tendulkar stay at tadoba for four days in chandrapur
sachin tendulkar stay at tadoba for four days in chandrapur

चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबीयासह सोमवारी (ता. 25) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. सचिनचा जवळपास चार दिवसांचा दौरा आहे. दुपारी अलीझंझा गेटमधून तेंडुलकर कुटुंबीयांनी ताडोबात प्रवेश केला. 

सचिनने आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाचे नाव जगभरात पोहोचविले. 32 वर्षांपूर्वी सचिनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. जंगल, वाघ याची आवड असलेल्या सचिन आपल्या परिवारासोबत मागीलवर्षी 24 जानेवारी 2020 रोजी आला होता. त्यावेळी दौऱ्यात तेंडुलकर परिवाराला वाघासह अन्य प्राण्यांचे दर्शन झाले होते. तब्बल एक वर्षांनी परत एकदा तेंडुलकर कुटुंबीय ताडोबा भ्रमंतीसाठी आले आहे. सोमवारी (ता. 25) दुपारी तेंडुलकर कुटुंबीयांचे अलिझंझा गेटमधून आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा यांची उपस्थिती होती. दुपारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअरझोन, बफर झोन आणि व्याघ्रप्रकल्पाला भेट दिली. तेंडुलकर आपल्या कुटुंबासह बफरझोनमध्ये सफारी करणार असल्याची माहिती आहे. येत्या 28 जानेवारीपर्यंत तेंडुलकर कुटुंबीय ताडोबात मुक्कामी असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com