ओसंडून वाहतोय यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

यवतमाळ : मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहायला लागतला आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्‍यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्‍यात येतो. हा धबधबा उमरखेड पासून 70किलोमीटर अंतराववर तर यवतमाळपासून 181 किलोमीटर अंतरावर आहे. परतीच्या पावसाने हा धबधबा तुडूंब भरून वाहतो आहे. धबधब्यातील पाणी पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे.

30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahasrakund fall in Yavatmal district