अर्जाविनाच स्वीकारली उमेदवारी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नागपूर - ‘९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी...’ असा उल्लेख करून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मदन कुळकर्णी यांनी दिलेला एक बंद लिफाफा विदर्भ साहित्य संघाने उमेदवारी अर्ज म्हणून स्वीकारला. यानिमित्ताने गुरुवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पहिल्या वादाचा श्रीगणेशाही झाला.

नागपूर - ‘९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी...’ असा उल्लेख करून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मदन कुळकर्णी यांनी दिलेला एक बंद लिफाफा विदर्भ साहित्य संघाने उमेदवारी अर्ज म्हणून स्वीकारला. यानिमित्ताने गुरुवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पहिल्या वादाचा श्रीगणेशाही झाला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक वादाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. उमेदवारांचे आरोप-प्रत्यारोप, प्रचाराची चढाओढ किंवा वादग्रस्त विधानांमुळे ही निवडणूक गाजत असते. या वादांच्या यजमानपदाचा मान कुठल्याही शहराला मिळू शकतो. यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ विदर्भात असणे आणि विदर्भ साहित्य संघानेच या वादाचे यजमानपद ओढवून घेणे हा ‘अप्रतिम’ योग साधला आहे. तीन ऑक्‍टोबरपासून उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले. डॉ. मदन कुळकर्णी यांनी पहिल्याच दिवशी अर्ज प्राप्त केला आणि बुधवारी (ता. ५) एक बंद लिफाफा साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांच्याकडे सोपवला. 

आज अक्षयकुमार काळे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर विलास मानेकर पत्रकारांपुढे आले आणि आतापर्यंत डॉ. काळे व डॉ. कुळकर्णी यांचे उमेदवारी अर्ज साहित्य संघाला प्राप्त झाल्याचे सांगितले. त्यावर मदन कुळकर्णी यांचे सूचक व अनुमोदक कोण आहेत, असा सवाल केला असता मानेकरांनी ‘लिफाफा बंद आहे’ असे सांगितले. 

‘डॉ. मदन कुळकर्णी यांनी बंद लिफाफा आमच्याकडे दिला आहे. तो आम्ही उमेदवारी अर्ज म्हणून स्वीकारला. हा लिफाफा १० ऑक्‍टोबरपर्यंत उघडू नये, अशा सूचना मदन कुळकर्णी यांनी केल्यामुळे त्यांचे सूचक व अनुमोदक सांगणे अशक्‍य आहे,’ असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे डॉ. कुळकर्णी यांनी दिलेल्या लिफाफ्यात उमेदवारीचा अर्ज आहे की नाही, याची शहानिशा न करता स्वतःहून त्यांची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रताप विदर्भ साहित्य संघाने केला. डॉ. कुळकर्णी निवडणूक लढवणार आहेत, असे संकेत त्यांनी स्वतःच यापूर्वी दिले आहेत. मात्र, बंद लिफाफ्यात त्यांचा उमेदवारी अर्जच आहे, यावर घटक संस्थेने विश्‍वास ठेवला, याचे आश्‍चर्य आहे. या प्रकाराच्या निमित्ताने साहित्य संघाने एका नव्या वादाचे ‘सप्तक’ सूर छेडले आहेत.

Web Title: sahitya sammelan chariman election