मुख्यमंत्री, संमेलनाध्यक्षांना निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

यवतमाळ : येथे जानेवारी महिन्यात 11, 12 व 13 तारखेला होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण आयोजन समितीने मंगळवारी (ता.11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, कार्यवाह प्रा. घनश्‍याम दरणे, समन्वयक अमर दिनकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी संमेलनाच्या कार्यप्रगतीबाबत विचारपूस करून संमेलनाला येण्याचे मान्य केले. सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांनी साहित्य संमेलनाला येणे हा आमच्या खात्याचा एक भाग आहे. माझेही येणे निश्‍चित असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी पर्यटन मंत्रालय आणि माहिती जनसंपर्क कार्यालयामार्फत मदत करावी, अशी विनंती आयोजकांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यास तत्काळ अनुमती देऊन सचिवांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून निमंत्रण दिले.

Web Title: sahitya sammelan invitation