सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड'ने कतर्बगार व्यक्तिमत्त्वाचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : शून्यातून सुरुवात करीत कर्तृत्वाचा ठसा उमटवित यशाचे शिखर गाठणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगार 47 व्यक्तिमत्त्वांचा रंगारंग सोहळ्यात "सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड'ने गौरव करण्यात आला. अत्यंत कौटुंबिक वातावरणात रंगलेल्या या सोहळ्यातून समाजाला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख झालीच. शिवाय या सन्मानाने आणखी ऊर्मी मिळाल्याची भावना गौरवमूर्तींच्या चेहऱ्यावर दिसून आली. विशेष म्हणजे कुटुंबीयांच्या उपस्थितीत "सकाळ'ने पाठ थोपटल्यामुळे सत्कारमूर्ती भावुक झाले.

नागपूर : शून्यातून सुरुवात करीत कर्तृत्वाचा ठसा उमटवित यशाचे शिखर गाठणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तबगार 47 व्यक्तिमत्त्वांचा रंगारंग सोहळ्यात "सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड'ने गौरव करण्यात आला. अत्यंत कौटुंबिक वातावरणात रंगलेल्या या सोहळ्यातून समाजाला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख झालीच. शिवाय या सन्मानाने आणखी ऊर्मी मिळाल्याची भावना गौरवमूर्तींच्या चेहऱ्यावर दिसून आली. विशेष म्हणजे कुटुंबीयांच्या उपस्थितीत "सकाळ'ने पाठ थोपटल्यामुळे सत्कारमूर्ती भावुक झाले.
कमालीची चिकाटी, जिद्द आणि ध्येयाने वाटचाल करणाऱ्या सहकार, वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक, धार्मिक, आयुर्वेद, वित्तीय क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींचा आज रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे सकाळ माध्यम समूहातर्फे "सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड' देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन या विभूतींना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सकाळ समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे उपस्थित होते. अभिनेत्री सायली पाटील या सोहळ्याची विशेष आकर्षण होती. आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर सर केल्यानंतर सामाजिक कार्यातही योगदान देत देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव सोहळा कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे भावनाप्रधान सोहळा ठरला. मुलाला "सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड' घेताना बघून आईवडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले तर आई किंवा वडिलांचा गौरव होताना बघून मुलांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. पतीच्या कर्तृत्वाची दखल घेतल्याने पत्नीच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले तर पत्नीचा गौरव बघत पतींनी अभिमानाने मान उंचावली. यावेळी सत्कारमूर्तींनी कुटुंबीयांसोबत सत्काराचे क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवले तर घरातील व्यक्तीच्या सन्मानाने कुटुंबीय भारावले. आपल्या कर्तृत्वामुळे राष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भर घालणाऱ्या प्रत्येकानेच "सकाळ'ने दखल घेतल्याबाबत आनंद व्यक्त केला. या सोहळ्याची अनुभूती घेणाऱ्यांनी सत्कारमूर्तींकडून प्रेरणा घेतली. प्रास्ताविक कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी केले. श्‍वेता शेलगावकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार संचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तसेच शेवटी जल्लोष बॅंडच्या तरुणांनी चित्रपट गीते सादर करीत उत्साह निर्माण केला. जल्लोष बॅंडचे विशाल बागुल व पुनित कुशवाह तसेच कार्यक्रमाचे सोशल मीडिया पार्टनर अंकित अबाड यांचाही गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मान्यवरांचा झाला सन्मान
प्रकाश वाघमारे, नीलिमा बावणे, मुकुंदराव पन्नासे, डॉ. नीतेश खोंडे, ऍड. स्वप्नील मोंढे, सतीश मानकर, मोहंमद सुलेमान, डॉ. राजाभाऊ टांकसाळे, डॉ. प्रमोद गिरी व डॉ. चंद्रशेखर पाखमोडे, अजित पारसे, देवव्रत बूट, डॉ. आशीष चौधरी, प्रवीण शर्मा, प्रकाश कोहळे, डॉ. अभय शेंडे, डॉ. जयप्रकाश बारस्कर, प्रफुल्ल रेवतकर, डॉ. मृणालिनी दस्तुरे, वेदप्रकाश सोनी, डॉ. प्रवीण सहावे, अंबादास नारायण तितरमारे, सुधाकरराव इंगोले, रचना वझलवार, डॉ. संदीप सरटकर, विपीन तळवेकर, रमेशचंद्र राठी, श्रीकांत राठी, ऍड. अभिजित वंजारी, राजा भोयर, प्रदीप देशमुख, प्रफुल्ल मोहोड, विमल असाटी, डॉ. हेमंत सोनारे, डॉ. जगदीश तलमले, प्रा. विजय बदखल, डॉ. प्रकाश व माधुरी मानवटकर, राजेश काकडे, अजय हटेवार, डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, जयंत गणवीर, कमलनयन बजाज, पंकज चौरागडे, मोहन माकडे, अमित व राकेश मुलचंदानी, प्रा. डॉ. मारोती वाघ, डॉ. शिवनाथ कुंभारे, रवींद्र खडसे, डॉ. रोहित माधव साने, छाया अरविंद पोरेड्डीवार.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Sakal Excellence Award" honors the talented personality