सकाळतर्फे दहावीच्या विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर ः सकाळतर्फे मागील 15 एप्रिलपासून दहावी अभ्यासक्रम ही विशेष मालिका दहावीच्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून सुरू केली आहे. मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी या तिन्ही माध्यमांसाठी दररोज ही मालिका पुढील वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील व त्यामध्ये सर्व विषयांचे प्रत्येकी 19 लेख प्रसिद्ध होणार आहेत. दहावीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत बदलाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने जरीपटका येथील सेंट रॉबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे पालक सभेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

नागपूर ः सकाळतर्फे मागील 15 एप्रिलपासून दहावी अभ्यासक्रम ही विशेष मालिका दहावीच्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून सुरू केली आहे. मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी या तिन्ही माध्यमांसाठी दररोज ही मालिका पुढील वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील व त्यामध्ये सर्व विषयांचे प्रत्येकी 19 लेख प्रसिद्ध होणार आहेत. दहावीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत बदलाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने जरीपटका येथील सेंट रॉबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे पालक सभेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. मराठी, गणित, विज्ञान या प्रमुख विषयांवर कार्यशाळेत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रेमदास थोरात, शिक्षणतज्ज्ञ उमेश धवनकर, चंद्रहास्य बोरकर, प्राचार्य धनश्री बरसागडे, संस्थेचे संचालक जोतीराव बारसागडे, पर्यवेक्षिका आलीया अहमद उपस्थित होते. या तज्ज्ञांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाबाबत असलेली चिंता दूर करीत त्यांना टिप्स दिल्या. अभ्यासक्रम बदलाची गरज, समाविष्ट संकल्पना, कृतिपत्रिका त्याचे प्रकार तसेच कृतिपत्रिका सोडविण्याचे तंत्र विशद केले. पालकांनी मुलांचे रिमोट कंट्रोल होऊ नये, त्यांच्या पद्धतीने अभ्यास करू द्यावा. त्यांच्या अभ्यासावर लक्ष मात्र ठेवावे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रेमदास थोरात यांनी व्यक्त केले. ज्ञान मिळविणे, हे ध्येय हवे. विषय समजून घेतला की कोणतीही कृतिपत्रिका समोर आली, तरीही ती सहज सोडविता येईल. दहावीचा अभ्यास करताना सातवी, आठवी आणि नववीची पाठ्यपुस्तकेही जवळ ठेवा. ही पाठ्यपुस्तके एकमेकांशी संलग्न आहेत, असे मत उमेश धवनकर यांनी व्यक्त केले. संचालन विजय मनवर यांनी केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक अभिज्ञा बागडे, गौरव सहारे व शिक्षक-शिक्षिकांनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal guide for Class X students, parents