शेतकऱयांच्या नावावर कर्ज काढून रक्कम लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

आदिवासी शेतकऱयांच्या नावावर कर्ज काढून त्यांच्या खात्यावरून  रक्कम परस्पर एजंटच्या नावे करण्याचा डाव बँक व्यवस्थापक व कर्मचारी यांनी संगनमताने केल्याची तक्रार शिळवंडी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ . किरण लहामटे यांचेकडे केली असून एजंट व अधिकारी यांच्या विरोधात लवकरच पोलीस तक्रार देऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.

 अकोले- आदिवासी शेतकऱयांच्या नावावर कर्ज काढून त्यांच्या खात्यावरून  रक्कम परस्पर एजंटच्या नावे करण्याचा डाव बँक व्यवस्थापक व कर्मचारी यांनी संगनमताने केल्याची तक्रार शिळवंडी येथील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ . किरण लहामटे यांचेकडे केली असून एजंट व अधिकारी यांच्या विरोधात लवकरच पोलीस तक्रार देऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे . 

याबाबत समजते कि , शिळवंडी येथील आदिवासी शेतकरी सौ . इंदुबाई इंदुराव साबळे ,साबळे दूदा  बाबुराव ,साबळे इंदू ,साबळे काळू मंगळा  साबळे दगडू महादू , या पाच शेतकऱ्यांच्या नावे एजंट योगेश गंभिरे याने कार्पोरेशन बँक सुगाव शाखेत कर्ज प्रकरण करून सुमारे १३ लाख रुप्याचे कर्ज शेतीवर चढवून ते कर्ज व्यवस्थापक , क्लार्क याना हाथशी धरून शेतकऱ्यांचे सही अंगठे घेऊन आपल्या नावावर केल्याची तक्रार शेतकरी करीत आहे . याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याही संपर्क साधला असता आम्ही माहिती घेऊन कळवतो असे सांगण्यात आले आहे . याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु असून यापूर्वीही असे प्रकार झाले असून काही शेतकऱ्यांना आपल्या नवे कर्ज असल्याचे माहितीही नसल्याचे समजते शेतकऱ्याने  कर्ज माफी करण्याचे आंदोलन सुरु केले त्यावेळी सरकार कर्ज माफी देणार असे गृहीत धरून अनेक प्रकरणे या बँकेमार्फत करण्यात आले असून                        

Web Title: sakal news akola news farmer loan news bank

टॅग्स