पोलिस महासंचालक कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर

अनिल कांबळे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

महासंचालकांकडून अपेक्षा
पोलिस महासंचालक दत्तात्रय पळसलगीकर २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पास झालेल्या हवालदारांचे पीएसआय बनण्याचे स्वप्न साकार करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. पोलिस महासंचालकांनी सकारात्मकता दाखविल्यास  पीएसआय पदाची पहिली यादी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नागपूर - अनुत्तीर्ण हवालदारांना पदोन्नती दिल्याच्या प्रकाराने पोलिस महासंचालक कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. पोलिस महासंचालकाच्या अधिनस्थ २०१३ साली घेण्यात आलेल्या हवालदारांना पदोन्नती देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेतली होती. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डावलल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले. त्याची दखल आस्थापना विभागाने घेतली आणि त्यांची महासंचालक कार्यालयात पेशी घेऊन पीएसआय पदावर पदोन्नती दिलेल्यांना पदावनत केल्याची चर्चा आहे.

या परीक्षेत पास झालेल्या हवालदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सकाळ’ने वृत्तमालिकेतून या विषयावर प्रकाश टाकला. यामुळे महासंचालक कार्यालय खडबडून जागे झाले. त्यामुळे येत्या काही दिवसांत पीएसआय पदाच्या पदोन्नतीचा तिढा सुटण्याची शक्‍यता आहे. 

पोलिस दलाची ३० वर्षांपेक्षा अधिक वर्षे सेवा करणारा हवालदार किमान अधिकारी होऊन सन्मानाने निवृत्त व्हावा, या हेतूने तत्कालीन पोलिस महासंचाल संजीव दयाळ यांनी २०१३ मध्ये हवालदारांची अर्हता परीक्षा घेतली होती. यात जवळपास १८ हजार कर्मचारी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण कर्मचाऱ्यांची यादी लावताना पोलिस महासंचालक कार्यालयातील काही वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आस्थापना विभागातील बाबूंनी संगनमत करून कोट्यवधींचा घोटाळा केला. 

अनुत्तीर्णांना पीएसआय म्हणून पदोन्नती देत उत्तीर्ण कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. प्रसारमाध्यमांनी यादीत झालेला घोळ बाहेर काढला. प्रकार उघडकीस येताच आस्थापना विभागातील विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली. पदोन्नती दिलेल्या नापास कर्मचाऱ्यांना महासंचालक कार्यालयात उपस्थित करण्यात आले. कक्षात सुनावणी घेऊन त्यांचे पीएसआय पद रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सकाळच्या पाठपुराव्यामुळे योग्य उमेदवारांना पदोन्नती देण्यात येणार आहे. 

महासंचालकांकडून अपेक्षा
पोलिस महासंचालक दत्तात्रय पळसलगीकर २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पास झालेल्या हवालदारांचे पीएसआय बनण्याचे स्वप्न साकार करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. पोलिस महासंचालकांनी सकारात्मकता दाखविल्यास  पीएसआय पदाची पहिली यादी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नियुक्‍ती केली रद्द
आस्थापना कार्यालयात ‘सेटिंग’ करून मिळवलेले पीएसआय पद जास्त काळ तग धरू शकले नाही. तक्रारी आणि माध्यमांच्या रेट्यामुळे अनेक नापास झालेल्या हवालदारांची पेशी आस्थापना कार्यालयात घेण्यात आली. त्यांची समजूत काढून त्यांचे उपनिरीक्षक पद काढून घेण्यात आले. त्यांना पुन्हा हवालदार म्हणून काम करावे लागणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: sakal news impact Directorate General of Police Office management

टॅग्स