सकाळ वऱ्हाड आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

सकाळ वऱ्हाड आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

अकोला- सकाळ माध्यम समूहाचा प्रत्येक उपक्रम विधायक असतो. यंदा सकाळ वऱ्हाड आवृत्तीने काढलेला दिवाळी विशेषांकात भरपूर साहित्य फराळ आहे. प्रत्येक वर्गासाठी त्यात खास काही तरी आहे. हा अंक अतिशय सकस आणि दर्जेदार झाला आहे, असे गौरोद्गार मान्यवरांनी काढले.

सकाळ वऱ्हाड आवृत्तीच्या अकोला कार्यालयात झालेल्या एका हृदय सोहळ्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले,  शिक्षणतज्ज्ञ व प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, प्रसिद्ध हास्यकवी अॅड्. अनंत खेळकर, समर्थ एज्युकेशनचे संचालक प्रा. नितीन बाठे, प्रा. संतोष कुटे कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. संतोष कुटे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे, शैक्षणिक सल्लागार प्रा.दिलीप बिबे, सकाळ वऱ्हाड आवृत्तीचे सहयोगी संपादक संदीप भारंबे या मान्यवरांच्या हस्ते दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. आता हा अंक विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध झाला आहे.

विधायक कामांना प्राधान्य देणे हे सकाळचे धोरण खरोखर वाखाणण्यासारखे आहे. शेती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकाळची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हा दिवाळी विशेषांक सकस झाला आहे. - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

दिवाळी अंक वाचल्याशिवाय दिवाळसण पूर्ण होत नाही. सकाळ वऱ्हाड आवृत्तीचा दिवाळी अंक हा अतिशय दर्जेदार आहे. -अॅड्. अनंत खेळकर, हास्यकवी

दिवाळी विशेषांकातून एवढ्या मोठ्या प्रमाणात वैविध्य साधता येते हे या अंकाने दाखवून दिले आहे. विशेषांक गुणात्मक झाला आहे. - प्रा. नितीन बाठे, संचालक, समर्थ एज्युकेशन

जीवनात प्रगती करायची असेल तर वाचण्यााल पर्याय नाही. दिवाळी अंक खऱ्या अर्थाने वाचणाची भूक भागवू शकतात. हा अंक अतिशय सुरेख झाला आहे. - प्रा. संतोष कुटे, संचालक, प्रा. संतोष कुटे कोचिंग क्लासेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com